सोमवार, २५ जून, २०१८

मी आहे वटवृक्ष एकटाच उभा !

नमस्कार, वट पौर्णिमे निमित्त - 
अगदी पूर्वी मुंबई, दादर, ठाणे उपनगरांत वड पिंपळ औदुंबर आंबा असे भव्य वृक्ष खूप होते 
काही भागात बऱ्यापैकी जंगल होते , आता त्यातील बरेच वृक्ष तोडून मोठ्या वसाहती  
उभ्या राहिल्या आहेत, मी जिथे आता तात्पुरता राहतो त्या वसाहतीत शिरण्यासाठी एक 
रस्ता विकसित झाला , त्या रस्त्यावर अगदी मधोमध रस्ता दुभाजक म्हणून जणूकाही 
तो वटवृक्ष उभा आहे, तिथून नेहमी जाता येताना मला त्या वृक्षाविषयी काहीतरी वाटायचे , 
आणि वट पौर्णिमेला त्याच्या फांद्या तोडायला कोणीतरी आले आणि जणू त्या वडाचे शब्द 
माझ्या कानावर ऐकू यायला लागले, शहरात उरले सुरले वृक्ष आहेत त्यांच्याही ह्याच 
भावना असतील कदाचित ? - सुरेश पित्रे, ठाणे 
मी आहे वटवृक्ष एकटाच उभा !
वट पौर्णिमेसाठी एक माणूस आला डाजवळ फांद्या तोडायला 
मीही दुरून पहात होतो, त्या वडाचे बोल कानावर पडायला लागले    
कुऱ्हाड घेऊन तू आला आहेस माझ्या फांद्या तोडायला 
फांद्या रस्त्यावर जाऊन पडतील सुवासिनींना विकायला 
माझ्या अंगा खांद्यावर चालविणार आहेस का तू कुऱ्हाड ?
पण जरा बघ ! पक्षी, पाखरांनी थाटलय तिथे वर बिऱ्हाड 
आहे मी एकटा रस्त्यामधे, सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत झुरतोय 
होते इथे जंगलमाझ्या सभोवती खे,सोयरे, माझे सोबती 
बिल्डर नामक राक्षसाने, मुळासकट त्यांना उखडून टाकलं  
पाण्याविना तडफडून सुकून मरून गेले माझे सख्खे सोबती 
सुदैव माझं मी राहिलो जिवंतउभा एकटाच आज रस्त्यावरती 
तुम्ही पहात होतात स्वप्नं कधी पूर्ण होतील ह्या इमारती 
माझ्या सख्यांची करून मातीस्वप्न तुमची पुरी होणार होती 
मी आणि माझे सोबती देत होते शुद्ध हवा आणि प्राणवायु 
आता मी मात्र सतत हुंगतो आहे वाहनांचा विषारी काळा धूर 
हो आह्मी हुंगतो कार्बन डाय ऑक्साईड , पण इतके प्रदुषण ?
झाडे कापून माणूस आळवितो आहे शहरांचा कर्कश्श सूर 
माझ्या सग्या सोबतींचा जीव घेऊन उभ्या राहिल्या ह्या इमारती 
तिथे अनेक माणसांचा , कुटुंबांचा झाला आहे वंश विस्तार 
मलाही वाटतेइथे खाली जमिनीवर माझ्या पारंब्या रुजवाव्यात 
पण आता जमिनीवर डांबर टाकून, रस्ता झाला आहे टणक आणि 
नेमाने तुम्ही स्वतःचे कापता केतशाच कापता माझ्या पारंब्या 
नाहीतर त्यांच्या मुसक्या बांधू आवळून माझ्याच अंगावर बांधून ठेवता 
आता वट पौर्णिमेला माझी पूजा करायला कमी येतात त्या सुवासिनी 
माझ्याभोवती ओतलय डांबर , त्यामुळे जमिनीत मुरत नाही पाणी 
मीही आता वाट पाहतो कधी येईल पाऊस आणि मिळेल मला पाणी 
पूर्वी कधी काळी प्रदक्षिणा करताना लक्ष तरी देत होते माझ्याकडे कोणी 
नशीब माझेदेवाने योजना केली हे वेगळी माझ्या वंश विस्ताराची
ते पक्षी खातात माझी फळे , विष्ठा टाकतात जमिनीवरइमारती वरती 
त्या इमारतीवर कुठेही रुजतात त्या पक्षांच्या विष्ठेतल्या बियाआणि !
त्याच इमारतींवर उगवली आहेत वडाची कोवळी रोपेवाढेल तो वट - वंशवेल
ती रोपे सांगत आहेत कि हो ! इथेच होते आमचे सखे, सोयरे आणि सोबती 
उखडून टाकून मारून टाकलेत त्यांना तरी, खुंटणार नाही हा वटवंश 
तुमच्या आधी आमचाच होता ह्या जमिनीवर पहिला राहण्याचा हक्क 
मी आहे वटवृक्ष एकटाच रस्ता दुभाजक बनून रस्त्याच्या मधोमध उभा  
माझ्या दोन्ही बाजूने सतत चालु असते वर्दळ आणि ये - जा वाहनांची 
त्रास होतो ! पण सवय झाली आहे आता वाहनांच्या भोंग्यांच्या कर्कश् आवाजाची
कान किटले आहेत ह्या शहरी गोंगाटानेगुदमरून गेलोय वाहनांच्या धुराने 
सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत, दुर्दम्य आशा ठेवुन आहे फक्त जगण्याची.
लेखक / कवी  - सुरेश पित्रे, ठाणे 

सूर्य स्तवन मराठी (अभंग)


सूर्य स्तवन (संस्कृत) 
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने । 
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।।
एकचक्ररथो यस्य दिव्यः कनकभूषणः । 
स मे भवतु सुप्रीतः पद्महस्तो दिवाकरः ।। 
सूर्य स्तवन (मराठी) - अभंग 
सूर्यांस वंदिती | जे रोज सदा हो | 
दरिद्रता त्यांना | न ये ती कधीच ||
एक चाकी रथ | ज्याचा सजलेला | 
सोन्याचा दिव्य | छान झळकतो ||
असा सूर्यदेव | मला लवकरी |  
प्रसन्न होऊ दे | देव दिवाकर ||  
रघुनाथसुत 
(सुरेश पित्रे), ठाणे 



रविवार, २४ जून, २०१८

|| गाय झाडे पाणी पुराण - खंडकाव्य ||

|| गाय झाडे पाणी पुराण - खंडकाव्य ||

पाणी ते पिताना | पाण्याचे महत्व | पटवून घ्यावे |  सर्वांनी हो ||||
पाणी ते सहज | साठते साठते | तलाव नि टाक्या | बांधावे हो ||||
थेंब तो पाण्याचा | वाचवा वाचवा | गाळ तो उपसा | पाण्यासाठी ||||
पाणी ते अडवा | पाणी ते जिरवा | पाणी ते साठवा | भूमीमध्ये ||||
तलाव बांधुनी | पाणी जिरवूनी | दुष्काळ हटवा | भारतांत ||||
पाणी ते दूषीत | करू नका कोणी | विहिरीत घाण | टाकू नका ||||
आड उपसतां | नित्य आणि रोज | शुद्ध ते मिळेल | पाणी तुम्हा ||||
शहरांत सुद्द्धा | पाणी जिरवूनी | पाण्याची पातळी | वाढवा हो |||| 
आटतां झरा तो | प्रवास संपतो | जीवन संपते | जाणा तुम्ही ||||
विचार जरी का | पटतो जयांस | तयांस म्हणावा | माणूस हो ||१०||
पाणी ते जपून | वापरा तुम्ही हो | पाणी ते सर्वांस | मिळावे हो ||११||
बदा बदा पाणी | ओतू नका कोणी | अपव्यय नको | पाण्याचा तो ||१२||
थेंबही तो वाया | दवडू नका हो | पाणी हे जीवन | विसरू नका ||१३||
पाण्याने सर्वांची | तहान भागते | पाण्यानेच धान्य | खूप होते ||१४||
शेती हि पिकतां | अन्न ते मिळते | अन्नाने भागते | भूक ती हो ||१५|
रोप ते लावतां | पाणी शिंपडावे | वृक्ष मोठा होतां | देतो छाया ||१६||
बीज ते पेरावे | एक नि अनेक | वाढेल मग ते | वृक्ष धन ||१७||
वनं ती वाढतां | मिळे प्राणवायू | आरोग्य लाभेल | सर्वांना हो ||१८||
प्रगती होतां ती | पाणी झाले घाण | रोगांचे वाढले | प्रमाण ते ||१९||
ढग गडगडतो | पाऊस तो धो धो | पाणी गटारांत | वाया जाते ||२०||
निसर्ग तो देतो | भर भरून तो | माणूस करंटा | झाला इथे ||२१||
पावसाचे पाणी | जातें गटारांत | माणूस पाहतो | फक्त इथे ||२२||
शिकला असुनी | नुसतीच चर्चा | पाणी जाते वाया | दरवर्षी ||२३||
शहरांत पाणी | जाते पहा वाया | खाडीत गेले ते | वाहुनियां ||२४||
नको नको चर्चा | पाणी पूजनीय | नका दवडू ते | पाणी वाया ||२५||
मनीं माणसां रे | चिंतन करावे | जल वंदनीय | जाणा तुम्ही ||२६||
तन मन धन | अर्पुनी आपण | पाणी मुरवावे | अमूल्य ते ||२७||
वाढली सर्वत्र | पाण्याची टंचाई | नको अपव्यय | पाण्याचा हो ||२८||
घरं आवारांत | एका कोपऱ्यात | पावसाचे पाणी  | मुरवूया ||२९||
शेतकऱ्यांची ती | आत्महत्त्या होता | किती नुकसान | भारताचे ||३०||
कृषीप्रधान हा | देश हा म्हणावा | प्रश्न तो पडला | आज सर्वां ||३१||
शहरांत आता | कमी झाले पाणी | त्रस्त झाली लोकं | पाण्याविना ||३२||
वृक्षा रोपण नि | जल संधारण | गुंतवणूक ती | भविष्याची ||३३||
जल साठवावे | माठांत भरावे | थंड जल प्यावें | तृप्त व्हावे ||३४||
मनी ते ठसवा | गळती थांबवा | थेंब तो वाचवा | जीवन हे ||३५||
किती ते तोडले | वृक्ष मानवाने | म्हणून आपदां | आज आलीं ||३६||
झाडें ती तोडतां | निसर्ग कोपतो | दुष्काळ पडतो | जाणा तुम्ही ||३७||
भविष्याचे पाणी | आतांच खेचले | भूमी झाली शुष्क | शहरांची ||३८||
पन्नास वर्षांचे | पाणी ते भूमीत | पुन्हा ते भरणे | कर्तव्य हो ||३९||
गृह प्रकल्पांत | पाणी मुरवा ते | बोअरिंग लावा | पाण्यासाठी ||४०||
पाणी ते तितके | वाचेल नाही का | धरणाचा साठा | वाचेल हो ||४१||
पाणी ते मग हो | वाचले ते जे | शेतीला मिळेल | पाणी खूप ||४२||
पाणी पाहिजे ना | मग रोपे लावा | वृक्ष ते वाढवा | पाण्यासाठी ||४३||
होता जणू स्वर्ग | भारत देश तो | आज तो उजाड | आहे झाला ||४४||
डोंगर बोडके | उजाड ते झाले | जमीन ओसाड | झाडाविना ||४५||
गाईच्या शेणाने | जमीन ती मऊ | पाणी ती शोषते | खूप खूप ||४६||
देशी गाई आता | पुन्हा हो पाळूया | गोधन जरुरी | पाण्यासाठी ||४७||
नको रसायने | भूमी होते घट्ट | ढेकळे जणू ती | दगड हो ||४८||
गाईच्या शेणी त्या | जळणंही होते | झाडे ती वाचती | शेणी मुळे ||४९||
औषधी ते वृक्ष | उपयोगी जाणा | कारे हो दुर्लक्ष | माणसांचे ||५०||
पंचगव्य ते हो | पीतां हो औषधी | आरोग्य लाभते | मानवाला ||५१||
एकमेकांवरी | आहे विसंबून | गाय झाडे पाणी | चक्र जाणा ||५२||
शेण खताने ती | झाडे हो वाढती | पाणी ते खेचती | आकाशाचे ||५३||
शेण खताने ते | शुद्ध पाणी अन्न | नाहीच विकृती | आरोग्याची ||५४||
रसायने ती हो | घातक काही ती | अती झाली आता | थांबवा ती ||५५||
अती तिथे माती | म्हणं ती जाणा | प्राचीन संस्कृती | श्रेष्ठ आहे ||५६||
कृषी आणि ऋषी | आपली संस्कृती | भविष्यासाठी ती | जपा तुम्ही ||५७||
शहरी संस्कृती | ठरली घातक | फक्त प्रदूषण | त्याने होते ||५८||
शहरी संस्कृती | गोऱ्याने आणिली | आह्मी वाढविली | घात झाला ||५९||
कृषी संस्कृती हो | वेगाने संपली | शहरी संस्कृती | अती झाली ||६०||
गाय पूजनीय | अन्न शुद्ध होते | वृक्ष वंदनीय | पाण्यासाठी ||६१||
- सुरेश पित्रे , चेंदणी , ठाणे (पश्चिम)