सोमवार, २ जुलै, २०१८

प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //

अतीकोपता कार्य जाते  लयाला,
अती नम्रता पात्र होते भयाला 
अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।  ।।

अती क्रोध नको / नकोच रे बाबा / कार्य ते बुडते / जाते रे लयाला //
अती नम्रता रे / तीही रे नकोच / भय ते निर्माण  / तयाने ते होते  //
अती काम ते रे / नकोच कोणते / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१//

अती लोभ आणी जना नित्य लाज,
अती त्याग तो रोकडा मृत्य आज 
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।  ।।
अती लोभ नको / नकोच तो जाणा / आणतो रे नि-त्य / लाज रे जनाला //
अती त्याग तो रे / नकोच नकोच / लगेच मृत्त्यु तो / आजच रे येतो //
स्वस्थ नि तृप्त रें / सदैव रहावें / सर्वांस दिसावे / नेमस्त सदा रे //
सर्व काही ते रे / नेटके असावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //२//

अती मोह हा दु: शोकास मूळ,
अती काळजी टाकणे हेही खूळ
सदा चित्त हे सद्विचारे कसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ।।


अती काळजी ती / सोडणे हे खूळ / निष्काळजी ती रे / नसावी नसावी //
चित्ती सदा नित्य / शुभ ते जाणावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //३//

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,
अती खेळणे हा भिकेचाच पाया 
 कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।  ।।
अती तो अभ्यास / ज्ञानाचा तो वाया / क्षीण होते काया / अती तिथे माती //
अती खेळणे ते / तेही जाते वाया / भिकेचा तो पाया / नकोच रे बाबा //
अती आराम तो / नको नको तो रे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //४//

अती दान तेही प्रपंचात छिद्र,
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र 
बरे कोणते ते मनाला पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।  ।।
अती दान नको / प्रपंचात तुम्ही / संसारात धन / जपून खर्चावें //
अती कंजुष तू / नको रे बनू रे / गरज त्याला ते / दान ते करावें //
बरें वाईट ते / मनाला पुसावें / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //५//

अती भोजने रोग येतो घराला,
उपासे अती कष्ट होती नराला 
फुका सांग देवावरी का रुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।  ।।
अती भोजनानें / अपचन होतें / रोग शरीराला / तसाच घराला //
अती उपवास / कष्ट शरीराला / उगाच शिण तो / वाया सर्व जाई //
''उप'' म्हणजे रे / देव तो जाणावा / ''वास'' सहवास / उपास जाणावा //
नाम स्मरणांत / रंगून जो जातो / तहान भूक ती / विसरून जातो // 
असा उपवास / जाणावा खरा रे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //६//

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड 
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।  ।।
अती परीचय / नकोच नकोच / अवज्ञा ती होते / अपमान तोही //
अती द्वेष होता / 
अती मत्सरें का / कुणाला छळावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //७//

अती आळशी वाचुनी प्रेतरूप,
अती झोप घे तोही त्याचाच भूप 
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।  ।।
अती आळसाने / बने प्रेतरूप / अती झोप घेतां / तोही प्रेतरूप //
सदैव नि नित्य / सत्कर्म करावें / संस्कार बाळांस / असेच ते द्यावे //
त्यातची मग तो / आत्माची विसावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //८//

अती द्रव्यही जोडते पापरास,
अती घोर दारिद्य्र तो पंकवास 
धने वैभवे त्वां  केंव्हा फसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।।  ।।
अती द्रव्य होतां / जमे पापराशी / पापामुळे भोग / भोगावे लागती //
अती ते दारिद्र्य / कोणासी नसावें / धन वैभवांत / कधी ना फसावें /
मायेच्या मोहांत / कधी ना फसावें / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //९//

अती भाषणे वीटती बुद्धिवंत,
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत 
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती बोलतां तो / वीट बुद्धिवंता / अती मौन होतां / मुकस्तंभ तो रे //
खरे तत्व ते रे / सांगें अल्पशब्दे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१०//

अती वाद घेता दुरावेल सत्य,
अती `होस होबोलणे नीचकृत्य 
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।
अती वाद होतां / अती ते ताणता / वाढतो रे तंटा / दुरावते स-त्य / 

अती होहो तेरे / जाणं  नीचकृत्य / विचार करुनी / ज्ञान ते हो घ्यावे / 
सार ते जाणोनी / मार्गस्थ व्हावें / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //११// 
अती औषधे वाढवितात रोग,
उपेक्षा अती आणते सर्व भोग 
हिताच्या उपायास कां आळसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती औषधे ती / वाढविती रोग / उपेक्षा अती ती / आणते रे भोग //
हितांचे असतां / नको आळस रे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१२//

अती दाट वस्तीत नाना उपाधी,
अती शून्य रानात औदास्य बाधी 
लघुग्राम पाहून तेथे वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती गर्दी होतां / वाढतें उपाधी / अती शून्य रानीं / औदास्य ते बाधे //
छोटे गांव तेथे / पाहुनी वसावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१३//
अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी 
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती शोक तो / दुःख ते वाढवी / अती आनंदे ती / जाणं क्षूद्रबुद्धी //
अती भोग येतां / कोणी ते पुसावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१४//

अती भूषणे मार्ग तो संकटाचा,
अती थाट तो वेष होतो नटाचा 
रहावे असे की  कोणी हसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
अती भूषणे तो / मार्ग संकटाचा / अती थाट तो रे / वेष हो नटाचा //
रहावे असे की / कोणी ना हसावें / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१५//

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती 
 कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

अती स्तुती होतां / कुत्र्याची प्रवृत्ती / निंदा अती होतां / होते दुष्ट चित्त //
नको ते कुणाला / शब्दाने छळावें /  प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१६//

अती भांडणे नाश तो यादवांचा,
हठाने अती वंश ना कौरवांचा 
कराया अती हे  कोणी वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती तंटा होतां / यादव नाशिले / अती हट्ट होतां / कौरव ते मेले //
नको अती अती / कोणी ते करावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१७// 

अती गोड खाणे नसे रोज इष्ट,
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ 
असोनी गहू व्यर्थ खावे  सावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

अती गोड धोड / रोज ना चांगले / अती तेलकट / आरोग्यांस बाधे //
अती तिखट नि / नको ते खारट / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१८//

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी 
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

जुन्या चाली रीती / सांभाळू म्हणती / नकोत अती रे / असे हटवादी //
नव्याच्या अती ते / नादाने फसती / अती नव्याचे ते / लाड ते नको रे //
सुवर्ण मध्य तो रे / योग्य सार घ्यावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //१९// 

सदा पद्य घोकोनियां शीण येतो,
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो 
कधी ते कधी हेही वाचीत जावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।। 

अती घोकोनियां / पद्याचा कंटाळा / शीण खूप येतो / पद्द्य ते घोकतां //
अती वाचोनियां  / गद्याचा कंटाळा / त्रास खूप होतो / गद्य ते ऐकतां //
गद्य आणि पद्य / दोन्ही ते वाचावे / प्रमाणात सर्व / सर्व तें असावें //२०//