शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२


         || अजगराचा विळखा ||
चरस गांजा अमली पदार्थ | प्राशिता होई अनर्थ |
विसरून जाती जीवनाचा अर्थ | नशाबाज लोकं ||१||
काहि श्रीमंत पैसा फेकती | मुले पालकांच्या प्रेमांस मूकति |
सारें काहि पैशात तोलती | जाहला अती पैसा ||२||
ताणतणाव वाढले जीवनी | नशेने ताण होतील कमी | 
गैसमज हा पसरला जनी | आज श्रीमंत समाजामधे ||३||
पदार्थ नशीले सेवन करती | कर्कश्श संगीत ऐकती |
नशेत बेधुंद नाचती | अमली पदार्थाची नशा चढता ||४||
कोणी गम्मत म्हणून घेती | मित्रांचा आग्रह म्हणून चाखती |
पदार्थ नशीले जाळ्यात ओढती | कोणा नवोदितांस ||५||
दारूचा पिउनी घोट | झुरके  देऊनी पितो  सिगारेट |
तरुणांस वाटते ही ऐट | जन म्हणती तरुण बिघडला ||६|| 
जगात वाढला उपभोगवाद | बळावला चंगळवाद |
समाजात नाही सुसंवाद | -हास होतो समाजाचा ||७||
गरजेपेक्षा मिळकत जास्त | तयांना नशीले पदार्थ स्वस्त |
क्षणात करती फस्त | एकाच पार्टीमधे लाखो रुपये ||८||
पैशाचा चढतां माज | सोडूनी देती जगाची लाज |
कोणाचा न चाले इलाज | नशेच्या अंमलात ||९||
गम्मत म्हणून एकदा घेता | गंमतीची चटक लागतां |
चटक पुरविण्या चोरी करविते | वाईट असते नशा ||१०||
जीवनी नाही आशा | म्हणून कोणी करती नशा |
नशाही त्यांची करते निराशा | नशेच्या अंतघडीस ||११||
समाजात चालला भ्रष्टाचार | समाजात वाढला अनाचार |
पैशासाठी माणूस लाचार | पहा कली मातला ||१२||
नशा जीवनी नाही उचित | व्यसन जडता निश्चित |
मृत्यू येईल अवचित | करू नये कोणतीच नशा ||१३||
नशीले पदार्थ म्हणजे धोका | जणू अजगराचा विळखा |
समाजांस गिळेल अख्खा | प्रसार त्याचा वेळीच रोखा ||१३||
गुटखा तंबाखू खाऊ नका | जीव धोक्यात घालू नका |
पचापचा रस्त्यात थुंकू नका | स्वच्छ ठेवा आपली शहरे ||१४||
कवी / प्रेषक - सुरेश पित्रे, ठाणे, महाराष्ट्र