बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

नर्मदा परिक्रमा + पर्यावरण रक्षण

नर्मदा परिक्रमा + पर्यावरण रक्षण 

खरे म्हणजे इथून जाताना प्रत्येक परिक्रमावासीने जमतील तितक्या विविध प्रकारच्या भरपूर
बिया घेऊन जायच्या आणि तिथे जिथे आराम करायला थांबु तिथे त्या मातीत पेरायच्या 
१०० बिया पेरल्या तर त्यातली २५ झाडे तर होतील , लिंबाच्या बिया जास्त घेऊन जा कारण 
उन्हाळ्यात तिथे लिंबु पाणी पिण्यासाठी कुठे लिंब उपलब्ध नसतात , किंवा मग ह्या बिया 
त्या आश्रमाच्या साधुजवळ द्यायच्या म्हणजे त्याची पावसाळ्यात रोप करून ते
वाढवु शकतील ,  कारण तिकडे काही भागात ह्या बिया सुद्धा उपलब्ध होत नाहीत 
आणि आपण शहरात ह्या बिया कचऱ्यात फेकतो , त्याचीच पावसाळ्यात डंपिंगच्या मैदानावर 
छोटी रोपे उगवतात आणि पावसाळा संपल्यावर उन्हाने वाळुन / करपून जातात.  
suresh.pitre@gmail.com
NARMADA PARIKRAMA - SURESH PITRE, THANE, MAHARASHTRA

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

ARATI DHAN - CHALAN DEVACHI

।। आरती चलन देवाची ।।
जय देवा जय देवा चलन देवातुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।धृ।।
हजाराची नोट रद्द बाद झाली , तशीच पाचशेची बंदच झाली 
नुकतीच संपली होती दिवाळी , नोटेची बंदी मग जाहीर झाली 
खोट्या
 नोटांची रद्दीच झाली , काश्मीर मध्ये दगडफेक थांबली
कोणी
 व्यापारी कर चुकविती , काळा पैसा भिंतीमधे लपविती 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।१।।

जेव्हा नोटांवर बंदी हो आली , सोन्याची प्रचंड खरेदी झाली 
पाणी
विजेची इथे आहे टंचाई , तशीच झाली आज नोट टंचाई 
सरकारी
 कोणी लाच हा खातो , नोटांनी राजकारण तो खेळतो  
कसा
 जमतो हा काळा हो पैसा , अर्थकारणाला पोखरतो कैसा 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।२।।

काळा पैसा पडून सडून जातो , उलाढालीपासून लांब हा राहतो 
कोणी
 नोटा ह्या गंगेत टाकतो , पाप धुतले असे समजून घेतो 
खॊट्या
 नोटा ह्या कोण छापतोकाळा पैसा हा कसा पसरतो ?
रोखीचा
 कारभार बंद हा पडला , ऑनलाईन कारभार खूप वाढला 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।३।।

गरिबांचे आहे हातावर पोट , त्याचे आहे देवा उपाशी पोरगं 
एटीएमवर
 झाली तोबा हो गर्दी , बँकेतही झाली भरपूर गर्दी 
कालच
 एक हो बातमी वाचली , पोस्टाची रक्कम कोणी चोरली 
नोटांची
 कोणी गड्डी जाळली , नोटांची चर्चा ती सर्वत्र झाली 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।४।।

नोटांची सर्वाना लागली घरघर , रांगेत कोणाला येते चक्कर 
पडापडी धडपड लागते ठोकर , रांग हि सरकत नाही भराभर 
रांगेचा
 नोटांचा त्रास संपेना , मुश्किलीने एक नोट मिळेना 
रांगेत
 गोंधळ लोकांचा कल्लोळ , संपत नाही हा चलन कल्लोळ 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।५।।

लग्नाचे सोहळे किती खोळंबले , आजाऱ्याचे उपचार तेही रखडले 
कोणाचे
 पर्यटन पुढे ढकलले , रोखीचे व्यवहार सारे थांबले
नोटही
 कुठे बदलून मिळेना , पाचशेचे शंभर सुट्टे मिळेना 
चलनाचा
 तिढा सुटता सुटेना , लांबच लांब रांग संपता संपेना 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।६।।

नोटा संपल्या उद्या या म्हणतीउद्याचीही काही नाही शाश्वती 
काळ्या
 पैशाविरुद्ध आहे लढाई , नवीन नोटांची म्हणून टंचाई 
पाचशेच्या
 नोटेत चणे बांधतो , हजारची नोट भिकारी नाकारतो 
जुन्या
 नोटांचा असा विनोद चालतो , सोशल मीडियावर खूप गाजतो 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।७।।

स्वीस बँकेत कोणी पैसे ठेवतो , कोटी रुपयांचे कर्ज बुडवितो 
मल्ल्या
 लंडनला पळून जातो , सामान्य माणूस कंगाल बनतो  
जनतेची
 संपत्ती कर्जाऊ देती , मोठे व्यापारी ते कर्जे बुडविती 
त्यांची
 कर्जे कशी माफ होती ? , सरकारला विचारा जाब हा कोणी 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।८।।

कर्ज बुडवे हे कितीतरी असती , कर बुडवे हे कितीतरी असती 
सारवासारव सरकार करते खोटी , मल्ल्यासारखे किती पळून जाती 
करबुडवे
 लबाड व्यापारी पठ्ठे , काळ्या नोटांचे जमविती गठ्ठे 
देशाला
 लागती आर्थिक धक्के , सामान्य जनतेला बसती चटके 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।९।।

रोखीचे व्यवहार शक्यतो टाळा , पेटीएमने चहा मिळू लागला 
कॅशलेस
 व्यवहार होऊ लागला , तिथेही सायबर हल्ला झाला 
कोणी
 म्हणती मल्ल्याला पकडा , स्वीस बँकेतील पैसा हो काढा 
कर बुडव्याना आधी तुम्ही पकडाकाळा पैसा वाल्यांनाही पकडा 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।१०।।

काळा पैसा सोन्यामधे वसला , काळा पैसा इमारतीत वसला 
काळा
 पैसा भिंतीमधे दडला , काळा पैसा जमिनीमधे दडला 
प्लास्टीक
 पैशांत कारभार करा , रोकड तुम्हा हवी हो कशाला ?
सुरेश म्हणे
 हवी शुद्ध नीतिमत्ता , लाभेल तेव्हा गरीबाला सुबत्ता 
जय देवा जय देवा चलन देवा
तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।११।।

लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता - " वैद्य सदन "पहिला मजलाराघोबा शंकर रोड
चेंदणीठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. – ४००६०१