।। आरती चलन देवाची ।।
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।धृ।।
हजाराची नोट रद्द बाद झाली , तशीच पाचशेची बंदच झाली
नुकतीच संपली होती दिवाळी , नोटेची बंदी मग जाहीर झाली
खोट्या नोटांची रद्दीच झाली , काश्मीर मध्ये दगडफेक थांबली
कोणी व्यापारी कर चुकविती , काळा पैसा भिंतीमधे लपविती
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।१।।

जेव्हा नोटांवर बंदी हो आली , सोन्याची प्रचंड खरेदी झाली
पाणी, विजेची इथे आहे टंचाई , तशीच झाली आज नोट टंचाई
सरकारी कोणी लाच हा खातो , नोटांनी राजकारण तो खेळतो
कसा जमतो हा काळा हो पैसा , अर्थकारणाला पोखरतो कैसा
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।२।।

काळा पैसा पडून सडून जातो , उलाढालीपासून लांब हा राहतो
कोणी नोटा ह्या गंगेत टाकतो , पाप धुतले असे समजून घेतो
खॊट्या नोटा ह्या कोण छापतो, काळा पैसा हा कसा पसरतो ?
रोखीचा कारभार बंद हा पडला , ऑनलाईन कारभार खूप वाढला
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।३।।

गरिबांचे आहे हातावर पोट , त्याचे आहे देवा उपाशी पोरगं
एटीएमवर झाली तोबा हो गर्दी , बँकेतही झाली भरपूर गर्दी
कालच एक हो बातमी वाचली , पोस्टाची रक्कम कोणी चोरली
नोटांची कोणी गड्डी जाळली , नोटांची चर्चा ती सर्वत्र झाली
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।४।।

नोटांची सर्वाना लागली घरघर , रांगेत कोणाला येते चक्कर
पडापडी धडपड लागते ठोकर , रांग हि सरकत नाही भराभर
रांगेचा नोटांचा त्रास संपेना , मुश्किलीने एक नोट मिळेना
रांगेत गोंधळ लोकांचा कल्लोळ , संपत नाही हा चलन कल्लोळ
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।५।।

लग्नाचे सोहळे किती खोळंबले , आजाऱ्याचे उपचार तेही रखडले
कोणाचे पर्यटन पुढे ढकलले , रोखीचे व्यवहार सारे थांबले
नोटही कुठे बदलून मिळेना , पाचशेचे शंभर सुट्टे मिळेना
चलनाचा तिढा सुटता सुटेना , लांबच लांब रांग संपता संपेना
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।६।।

नोटा संपल्या उद्या या म्हणती, उद्याचीही काही नाही शाश्वती
काळ्या पैशाविरुद्ध आहे लढाई , नवीन नोटांची म्हणून टंचाई
पाचशेच्या नोटेत चणे बांधतो , हजारची नोट भिकारी नाकारतो
जुन्या नोटांचा असा विनोद चालतो , सोशल मीडियावर खूप गाजतो
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।७।।

स्वीस बँकेत कोणी पैसे ठेवतो , कोटी रुपयांचे कर्ज बुडवितो
मल्ल्या लंडनला पळून जातो , सामान्य माणूस कंगाल बनतो
जनतेची संपत्ती कर्जाऊ देती , मोठे व्यापारी ते कर्जे बुडविती
त्यांची कर्जे कशी माफ होती ? , सरकारला विचारा जाब हा कोणी
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।८।।

कर्ज बुडवे हे कितीतरी असती , कर बुडवे हे कितीतरी असती
सारवासारव सरकार करते खोटी , मल्ल्यासारखे किती पळून जाती
करबुडवे लबाड व्यापारी पठ्ठे , काळ्या नोटांचे जमविती गठ्ठे
देशाला लागती आर्थिक धक्के , सामान्य जनतेला बसती चटके
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।९।।

रोखीचे व्यवहार शक्यतो टाळा , पेटीएमने चहा मिळू लागला
कॅशलेस व्यवहार होऊ लागला , तिथेही सायबर हल्ला झाला
कोणी म्हणती मल्ल्याला पकडा , स्वीस बँकेतील पैसा हो काढा
कर बुडव्याना आधी तुम्ही पकडा, काळा पैसा वाल्यांनाही पकडा
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।१०।।

काळा पैसा सोन्यामधे वसला , काळा पैसा इमारतीत वसला
काळा पैसा भिंतीमधे दडला , काळा पैसा जमिनीमधे दडला
प्लास्टीक पैशांत कारभार करा , रोकड तुम्हा हवी हो कशाला ?
सुरेश म्हणे हवी शुद्ध नीतिमत्ता , लाभेल तेव्हा गरीबाला सुबत्ता
जय देवा जय देवा चलन देवा, तुमची कृपा सदैव आह्मावर ठेवा ।।११।।

लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता - " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. – ४००६०१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा