हा दोष मोनो रेल्वे यंत्रणेचा नाही.
मोनो रेल्वे तोट्यात जात आहे असा एक सूर सगळीकडे आळवला जात आहे
पण त्यामधे दोष मोनो रेल्वे ह्या यंत्रणेचा नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं
कारण मोनो रेल्वे चांगली कि मेट्रो रेल्वे ह्या विषयी मुख्य मुद्दे आणि माहिती देणारा
सविस्तर तुलनात्मक तक्ता वृत्तपत्रातुन प्रकाशित झालेला होता. त्या मधे
जर प्रत्येक मुद्द्याला गुण दिले असते तर मोनो रेल्वे श्रेष्ठ ठरेल असे ठरविणारा
तो तक्ता होता. पण तरीही मुंबईत बरेच ठिकाणी मेट्रोला डावलून मोनो रेल्वे प्रकल्प राबविला
गेला तो का ? , ह्याचे स्पष्टीकरण तज्ञ देऊ शकतील का ? कारण त्या तक्त्यात स्पष्टपणे दिले होते कि मोनोच्या तुलनेत मेट्रो मधे सीमेंट काँक्रिट , लोखंड आदि सर्व सामग्री जास्त प्रमाणात लागते त्यामुळे एकंदर प्रकल्पाचा खर्चही मोनोच्या तुलनेत मेट्रो रेल्वेला जास्त येतो , पण तोच खर्च जर अधिक लांबीच्या मोनो रेल्वेवर विभागला गेला असता तर जास्त क्षेत्रफळात आणि एकूण जास्त किमी लांबीची रेल्वेची सेवा जनतेसाठी निर्माण करता आली असती , पण हा स्पष्ट तक्ता समोर असतानाहि अशी योजना का राबविली गेली ह्याचे स्पष्टीकरण योजना राबविणारे देऊ शकतील का ? तेव्हा मुख्य मुद्दा हाच आहे कि मोनो रेल्वे तोट्यात आहे ह्या गोष्टीचा आणि तांत्रिक दृष्ट्या त्या यंत्रणेचा किंवा त्या प्रकल्पाचा ह्यात दोष नाही. मेट्रो पेक्षा मोनो रेल्वेच जास्त ठिकाणी राबविली असती तर श्रेष्ठ ठरली असती असे तुलनात्मक तक्ता सांगतो. कारण ती शहराच्या गजबजलेल्या वस्तीत छोट्या रस्त्यावरूनही धावू शकते हा मुख्य मुद्दाही त्यात होता. तेव्हा आता ठाणे आणि इतर गजबजलेल्या भागात मोनो किंवा मेट्रो प्रकल्प राबविताना तरी ह्या गोष्टीचा पुनर्विचार आधीच व्हावा.
- सुरेश पित्रे , चेंदणी ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा