|| जलप्रलय - २६ जुलै २००५ || |
अरे पावसा थांब रे थांब आता अवघा महाराष्ट्र जल प्रलयी बुडाला निसर्ग इतका आज काहो कोपला आसराच त्यांचा आज वाहुनी गेला अंग ओलेचिंब नाही एकही आडोसा चहूकडे तूच रे पावसा रे पावसा सूर्याचा दिसेना एकही तो कवडसा किती निर्दयी होशील तू पावसा ? गिळलीस निष्ठुरा पिता आणि माता बालकासी कोण पाजेल दुध आता ? चिमुरड्यासी आता आधार कोणता ? काय म्हणु तुज प्राणदाता कि हर्ता ? अपराध मानवाचा जरी असेल झाला शिक्षा झाली पुरे निसर्गा रे आता क्षमा त्यासी करण्या तूच आहेस मोठा हजारांवरी गेला आकडा तो मृतांचा पशु माणसांची काय केलीस दुर्दशा थोडी तरी दया दाखवी वरुणराजा जिथे नाही पाणी तिथे सत्वरी जा पूरग्रस्त तुजला पुन्हा रे विनविता आता तरी पावसा थांब रे थांब आता अरे पावसा थांब रे थांब आता |
सुरेश रघुनाथ पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम) , भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ Email ID - kharichavata@gmail.com |
शनिवार, ४ जून, २०११
२६ जुलै २००५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा