|| ढोंगी बाबा - भोंदू साधु || भोंदूच्या नादी नका लागू || | |
कोणी देती कोंबडीचा बळी | कोणी देती बकरीचा बळी | कोणी देती मुलांचा बळी | खुनशी अंधश्रद्धा ||१|| कोणी जिभेत त्रिशूल खुपसतो | तोंडामधे कापूर जाळतो | लिंबू कापून रक्त काढतो | हि सर्व हात चलाखी ||२|| कोणी जटेतून अंगठी काढतो | हातामधून उदी काढतो | अडाणी समाजास नादी लावतो | ढोंगी साधु बुवा ||३|| अशा प्रकारची करुनी जादू | पोट भरतो भोंदू साधु | भोंदूच्या नादी नका लागू | भोंदू लुटतो समाजाला ||४|| काही घालती भगवे कपडे | काही नुसतेच पंडीत बडबडे | प्रत्यक्षात स्वतः पाषाण कोरडे | बोले तैसा न चाले ||५|| काहींना जमते वक्तृत्वकला | काहींना जमते गायनकला | काहींना अवगत नेतृत्व कला | हि नव्हे साधूची व्याख्या ||६|| भक्तांस उन्हात राबविती | स्वतः पंख्याखाली बसती | वातानुकुलीत गाडीत बसती | ऐटबाज नकली साधु ||७|| भगवे कपडे परिधान करती | त्यागाच्या गोष्टी सांगती | स्वतः मात्र भोग भोगती | पक्के भोंदू बाबा ||८|| मोठ मोठ्या देणग्या घेतो | स्वतः साधु पक्वान्न खातो | भुकेल्यास खयखय डाळ वाढतो | ऐतखाऊ साधु ||९|| सामान्य भक्त देणगी देतो | त्यातून समाजकार्य साधतो | त्याचे श्रेय स्वतः लाटतो | ढोंगी बाबा - भोंदू साधु ||१०|| भोग भोगू नका सांगतो | स्वतः मात्र सर्व उपभोगतो | आचारणाविना बडबड करतो | हा नुसता उत्तम वक्ता ||११|| ज्याने देणगीचा उपभोग घेतला | भक्तीचा बाजार मांडला | नुसता जनसमुदाय जमविला | हा साधु नव्हे मव्हे ||१२|| मंडप भव्य मोठे सजविले | मोठ मोठे ध्वनीक्षेपक लाविले | स्वतःचे मोठे चित्र लाविले | हा साधु नव्हे नव्हे ||१३|| | रंगमंच रंगीत छान सजविले | प्रकाशझोताने चमकविले | खोट्या भक्तीचे भपके दाविले | हा साधु नव्हे नव्हे ||१४|| स्वतःचे स्वतः चित्र विकले | जाहिरात करुनी प्रस्थ वाढविले | फक्त स्वतःचे स्तोम माजविले | हा साधु नव्हे नव्हे ||१५|| नका जपू नुसताच मंत्र | शिकून घ्यावे व्यवसाय तंत्र | परिश्रम हाच यशाचा मंत्र | कष्टकर्मी बनावे ||१६|| भोंदू साधू करती शोषण | त्याविरुद्ध उचलू पाऊल आपण | मुला बाळांस देऊ शिक्षण | सुशिक्षित व्हावा समाज ||१७|| भगव्या कपड्यात जे भोगवादी | लागू नका त्यांच्या नादी | माणसाने असावे प्रयत्नवादी | कष्ट करावे निरंतर ||१८|| अंधश्रद्धेचा करुनी बाऊ | पेढ्या बर्फीचा खाती खाऊ | ढोंगी बुवा ऐतखाऊ | हेच मोठे लबाड ||१९|| अशा बुवांचे भांडे फोडावे | सत्य सर्वांसमोर आणावे | सर्व लोकांस सावध करावे | प्रत्येक ज्ञानीयाने ||२०|| फसू नका तुम्ही अज्ञानाने | आज झाली प्रगती विज्ञानाने | जाणून घ्या विज्ञान मार्गाने | सर्व क्रिया, प्रक्रिया ||२१|| अंधश्रद्धेवर करावा प्रहार | विज्ञान ज्ञानाचा करावा प्रसार | अंधश्रद्धेविरुद्ध करावा प्रचार | प्रत्येक व्यक्तीने ||२२|| कोणतीच गोष्ट नाही निराधार | घ्यावा विज्ञानाचा आधार प्रत्येक क्रिया पटवा स आधार | अंध श्रद्धाळू व्यक्तींना ||२३|| ढोंगी साधुविरुद्ध आपण भांडू | त्यांचे भांडे आपण फोडू | अंधश्रद्धा आपण निपटून काढू | हेच आपुले ध्येय ||२४|| असावे एखादे प्रेरणास्थान | असावे एखादे श्रद्धास्थान | पण अंध श्रद्धेला नसावे स्थान | आपल्या जीवनात ||२५|| अंधश्रद्धेचा अंधार संपवा | ज्ञानाने प्रकाश पडावा | ज्ञानाचा दीप उजळावा | सर्व समाजामधे || २६ || |
प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे. पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१ संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ , भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ Email ID – kharichavata@gmail.com |
शनिवार, ४ जून, २०११
|| ढोंगी बाबा - भोंदू साधु ||
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा