डासांना पळवून लावण्याचा धूर आरोग्यांस हानीकारक ?
शहरी भागांत डासांना पळविण्यासाठी जो धूर केला जातो तो आरोग्यास
हानिकारक तर नाही ना ? हा धूर कृत्रिम रासायनीक कीटकनाशके जाळून केलेला धूर असतो का ?
जर हा धूर मानवी आरोग्यासाठी अपायकारक असेल तर त्या ऐवजी शेणाच्या गोवऱ्या
जाळून धूर करणे हे जास्त योग्य ठरेल का ? गावातून ह्यासाठी शेणाच्या गोवऱ्या
मोठ्या प्रमाणात विकत घेऊन त्या शहरात जाळण्याची व्यवस्था केली तर गावातील
लोकांना आर्थिक मदतहि होईल. शेण्या जाळून केलेला धूर आणि त्या नंतर निर्माण होणारी राख पर्यावरणास उपकारक आहे अशी माहिती महाजालावर वाचायला मिळते. सध्या जो धूर फवारला जातो त्या धुराच्या वासावरून प्रथम दर्शनी तरी असे वाटते कि तो आरोग्यासाठी चांगला असेल असे वाटत नाही, तेव्हा ह्या गोष्टीची आधुनिक शास्त्रीय दृष्ट्या योग्य माहिती लोकांना कळावी आणि ह्या विषयाची शहानिशा करून शेण्या जाळून धूर करणे योग्य असेल तर ते करावे.
सुरेश पित्रे , ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा