गुरुवार, २८ मार्च, २०१३

II रंग मस्तीचा दिसला II


होळी आणि धुळवड हे सण साजरे (बोचरे) झाले , ते साजरे म्हणयचे कि बोचरे 
असे आज ह्या सणाचे स्वरूप झाले आहे, ते दोन दिवस आपण वृत्तपत्रात 
वाचतो आहोत , तेच मी शब्दबद्ध केले आहे , 

    II रंग मस्तीचा दिसला II
नको रे उडवू रंग I नको नको असा बेरंग I
एकाने मारला फुगा I भिजला मुलीचा झगा I
झाली शिवीगाळ भांडणे I मारणे आणि झोडणे I
रंगांची मारली फक्की I झाली मग धक्काबुक्की I
गुलाल डोळ्यात गेला I रेल्वेतून एक पडला I
दुसरा एक जखमी झाला I तिसरा तो वारला I
सडा रक्ताचा पडला I रंग मस्तीचा दिसला I
नाही राहिली समज I दंग्याचा चढला माज I
हि कसली रे होळी I जिथे एक आई रडली I 
पुत्र तीचा मेला हाय I कोसळली ती रे माय I 
पांढ-या रंगाने न्हाली I सून एक विधवा झाली I
ऐका ऐका हो मंडळी I नका खेळू अशी होळी I
खेळले ते धुळवड I झाली आयुष्याची परवड I
रंगाने काळिमा फासला I सणाचा कचरा झाला I
झाला आरडा ओरडा I सणामधे झाला राडा I 
गावात आहे ओरडा I पाण्याविना घसा कोरडा I
दहा वर्षे वाढले होते I झाड त्यांनी कापले होते I
झाड ते होळीत जळले I धूर शापित ओकून गेले I 

- सुरेश पित्रे. चेंदणी , ठाणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा