गाय हिरवा चारा खाते | तोंडामध्ये रवंथ करते | आम्हा सकस दूध देते | आबाल वृद्धांसाठी ||१|| गाय आम्हांस दूध देते | गावक-यांस रोजगार देते | भूकेल्याचे पोट भरते | कामधेनू माता ||२|| जमिनीची करावी मशागत | त्यात मिसळावे शेणखत | पिकेल उत्तम शेत | पारंपरिक पद्धतिने ||३|| शेती करावी शेणखतयुक्त | वापरावे शेणखत फक्त | करावे जमिनीस रसायनमुक्त | सर्व शेतक-यांनी ||४|| अधाशासारखी नसावी भूक | जमीन ठेवावी सुपीक | जमीन होईल नापीक | काही रसायने घातक ||५|| गाय बकरीचे खत | किंवा नैसर्गीक खत | ओल्या कच-यांचे खत | शेतीसाठी वापरावे ||६|| फळे भाज्या गावात पिकती | ट्रक भरभरून शहरात येती | कच-यांचे सर्वत्र साठती | ढीग साली देठांचे ||७|| शहरात हा मुबलक कचरा | त्याचे खातात रुपांतर करा | तेच शेतीसाठी वापरा | उत्तम असे पुनर्वापर ||८|| शहरांत कच-यांचा प्रश्न सुटेल | गावात खताचा प्रश्नं मिटेल | शहर-गावांस आधार मिळेल | एकमेकां सहाय्य करू ||९|| रसायने अती वापरू नका | जमिनीचा कस घालवू नका | जीव धोक्यात घालू नका | समस्त जीवजंतूंचा ||१०|| गाई म्हशी दूध देती | बैल शेतामध्ये राबती | उभे आयुष्य अर्पण करती | मानवजातीसाठी ||११|| गाय,बैल म्हातारी होता | न द्यावे त्यासं मारण्याकरिता | माता पित्यासम सांभाळता | पुण्य लाभेल ||१२|| गुरेढोरे होता निकामी | त्यांना पाहिजे चाराभूमी | दान देऊनी तुम्ही आम्ही | निर्माण करावी ||१३|| अनाथ मुलांसाठी शाळा | कर्णबधीरांसाठी शाळा | तशाच बांधाव्या गोशाळा | या भारतभूमीत ||१४|| गाय आपुली आहे माता | गोमाता आपुली देवता | जी प्रिय कृष्ण भगवंता | जीवापाड सांभाळावी ||१५|| गाई म्हशी निकामी होता | बळेच त्यांना गाडीत बांधता | मारण्यासाठी खाटिकांस देतां | हे तर महापाप ||१६|| | शेणखताचा उपयोग होतो | जमिनीचा कस वाढतो | शुद्ध गोमुत्राचा उपयोग होतो | रोग निवारणासाठी ||१७|| गोउत्पादने खास असती | गोसंस्था ती निर्माण करती | वापरून त्याची घ्यावी प्रचीती | प्रत्येक व्यक्तीने ||१८|| गोमय सर्वांकरिता | गोमुत्र औषधांकरीता | अनेक प्रसाधन उत्पादनांकरीता | वापर आहे प्रचलित ||१९|| गोशाळेस दान द्यावे | गोप्रजातीस सांभाळावे | गोउत्पादनांस जाणून घ्यावे | गोशाळेत जाउनी ||२०|| गाईच्या दुधाने शक्ती मिळते | गाईच्या दुधाने कांती चमकते | मेंदूची स्मरणशक्ती वाढते | बुद्धीवर्धक उपाय ||२१|| रसायनांनी थैमान घातले | फळे भाज्या सर्वत्र मिसळले | नसानसांत अवघे भिनले | मानवी जीवनांत ||२२|| प्रदूषणावर आहे उपाय | गाय आपुली माय | गाईविना तरणोपाय | आता नाही ||२३|| व्रत हे अंगिकारावे | गाईस आपुले मानावे | गाईचे ऋण फेडावे | ह्याच जन्मी ||२४|| मनात नसावा संशय | गाय तारील निःसंशय | आता करावा सुनिश्चय | गोवंश वाढवावा ||२५|| गरीब आणि धनीकाने | दान द्यावे स्वखुशीने | गोमहती अभिमानाने | सांगावी जगाला ||२६|| गाय खाटिकांस देता कोणी | विरोध करावा सर्वांनी | प्राण गाईचे वाचवुनी | गोहत्या रोखावी ||२७|| गोमांसाची निर्यात | नका करू परदेशात | भारतीयांची गोप्रजात | वाचविली पाहिजे ||२८|| गाय नसावी संकरीत | आयात थांबवा त्वरित | नष्ट न व्हावी गोप्रजात | भारत देशाची ||२९|| भारत देश कृषिप्रधान | गोधनाने व्हावा सधन | समृद्धीचे प्राचीन साधन | अवलंबावे देशाने ||३०|| करावे गाईंचे रक्षण | करावे धर्माचे रक्षण | करावे राष्ट्राचे रक्षण | प्रत्येक भारतीयाने ||३१|| || श्री कृष्ण भगवान की जय || || श्री गोमाता की जय|| |
प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे. पत्ता- "वैद्य सदन", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र.-४००६०१ संपर्क - ०२२ - २५३३३८६९ , २५३२६४२९ , |
हे स्तोत्र दादर येथून निघणा-या "भक्तीसंगम" MAY 2011ह्या मासिकात प्रकाशित झाले आहे.
PRESS CTRL KEY AND SCROLL UP THE MIDDLE BUTTON OF MOUSE TO SEE ENLARGED VIEW.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा