|| टॉवर कथा || घेऊ म्हणता घर | उभा राही कर्जाचा डोंगर | पैशाची घर घर | मागे लागते ||१|| ज्यांच्या हाती मनी पॉवर | त्यानी बांधले टॉवर | कमी पड़े विजेची पॉवर | उद्वाहनासाठी ||२|| कोणी म्हणे बिल्ट अप एरिया | कोणी म्हणे कार्पेट एरिया | ग्राहक म्हणे काय करुया | संभ्रम पडला ||३|| फ्लॅट घेण्याची सर्वाना घाई | पण वाढली महागाई | पैशाची भासे टंचाई | फ्लॅट विकट घेता ||४|| चाळ नावाची वाचाळ वस्ती | जिथे चाले गप्पा मस्ती | खर्च नाही जास्ती | घर मध्यम वर्गियांचे ||५|| चाळीचे फायदे अनेका | प्रसंग येता बाका | मदत करती एकमेका | शेजार धर्मं जपती ||६|| फ्लॅट नावाची नवी वसती | घराची दारे बंद ठेवती | स्वतःस कोंडून घेती | चार खोल्यांमधे ||७|| कोण आला कोण गेला | आजारी पडला वा खपला | न कळे शेजार-याला | खासीयत फ्लॅटची ||८|| वाडे पडून टॉवर बांधती | मजल्यांची नाही पाबंदी | कारभार चालला बेबंदी | सर्व शहरात ||९|| बिल्डर झाला सवाई | टॉवर झाले ठाईठाई | सर्वत्र पाणी,वीज टंचाई | म्हणती शांघाय करूया ||१०|| वीज नसता लिफ्ट चालेना | काय करावे कळेना | जनरेटरविना लिफ्ट हलेना | डीझेलही महागले ||११|| जमीन फक्त टॉवरसाठी | फ्लॅट आहे श्रीमंतांसाठी | घर नाही सामान्यांसाठी | मुंबई महानगरात ||१२|| सरकार जरी इथे मराठी | मुंबई सोडतो माणूस मराठी | मुंबई खुली परप्रांतीयांसाठी | रोज येतो लोंढा ||१३|| पैशाचा इथे आब आहे | टॉवरला बाथ टब आहे | वातानुकुलीत पब आहे | वाढली श्रीमंत संस्कृती ||१४|| करावे थोडे विचारमंथन | मजल्यांवर असावे बंधन | वाया न जावे कष्टाचे धन | धरणीकंप होता ||१५|| मुंबई बनता शांघाय | सामान्य माणसाचे होणार काय ? मुंबई मराठी माणसाची माय | हे खरे कि खोटे ? ||१६|| चाळ पाडून इमारत बांधली | चकाचक संस्कृती आली | चारचाकी मोटार आली | माणुसकी पार संपून गेली ||१७|| ============================== सुरेश पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम) भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९, Email ID - kharichavata@gmail.com |
शनिवार, ४ जून, २०११
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा