|| पाणी म्हणजे जीवन || थेंब थेंब साठवावा | थेंबे थेंबे तलाव भरावा | तलावातील गाळ उपसावा | जल साठ्यासाठी ||१|| लोकहो पाणी अडवा | लोकहो पाणी साठवा | लोकहो दुष्काळ हटवा | पाणी जमिनीत जिरवा ||२|| आवारात तलाव बांधावे | तलावात पाणी सोडावे | पावसाचे पाणी साठवावे | शहरी इमारतीत ||३|| विहिरीत कचरा टाकू नये | पाणी दुषित करू नये | जलस्रोत सुकू नये | ठेवावे हेच उदिष्ट ||४|| जलसंपदा वाचवा | विहिरीचा वापर करावा | नित्य उपसा असावा | जलशुधीसाठी ||५|| जर पाण्याचा झरा आटला | तर जीवनप्रवास संपला | विचार हा जयांस पटला | तोच खरा माणूस ||६|| पाणी जपून वापरावे | तेच लोकांस सांगावे | पाणी सर्वांस मिळावे | हाच असावा हेतू ||७|| बदा बदा पाणी ओतू नये | अपव्यय पाण्याचा करू नये | थेंबही वाया दवडू नये | पाणी म्हणजे जीवन ||८|| पाण्याने तहान भागते | पाण्याने अन्न पिकते | अन्नाने भूक शमते | सर्व सजीवांची ||९|| झाडांसाठी रोप लावता | रोपावर पाणी शिंपडता | रोपाचा मोठा वृक्ष होता | सावली मिळेल पांथस्था ||१०|| पेराल जेव्हा बीज अनेकदा | वाढेल तेव्हा वृक्ष संपदा | वाढेल मग जलसंपदा | तसाच मिळेल प्राणवायू ||११|| पाणी साठवावे आपण | करावे जलसंधारण | करावे वृक्षारोपण | गुंतवणूक भविष्याची ||१२|| ================================== सुरेश पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम) भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९, Email ID - kharichavata@gmail.com |
शनिवार, ४ जून, २०११
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...
फारच छान...
उत्तर द्याहटवा