|| वृक्ष आपला सखा मित्र || |
वाढले जागतिक तापमान | बिघडले सृष्टीचे तानमान | पर्यावरणाचे ठेवावे भान | एकविसाव्या शतकात ||१|| वडाच्या फांद्या तोडणे | मुळाविना फांदी पूजणे | वृक्षसंपदा ओरबाडणे | हे तर महापाप ||२|| वृक्षतोड करू नये | चुकीची प्रथा पाडू नये | फांदी वडाची तोडू नये | पूजा करण्यासाठी ||३|| वृक्ष लावावे सर्वत्र | वृक्ष आपुला सखा मित्र | वटवृक्षाचे लावूनी चित्र | पूजा करावी ||४|| बीज जमिनीत पेरावे | एक तरी रोप लावावे | झाड जीवापाड जपावे | भावी पिढीसाठी ||५|| वृक्षांचे उपकार थोर | पण अधाशी चंदनचोर | करती पाप ते घोर | वृक्ष तोडण्याचे ||६|| वृक्षांचे नको कुंडीत रोपटे | वृक्ष नसावे बोन्साय खुरटे | वृक्ष नसता पाणी आटते | दुष्काळ पडतो ||७|| प्राणसखा वृक्ष आपुला | सर्वस्व अर्पितो मानवाला | तरी कृतघ्न माणूस झाला | वृक्ष जाळूनी ||८|| आंबा,फणस वृक्ष सगळे | वृक्ष देती गोड फळे | फुलांमधून मध मिळे | शोषते मधमाशी ||९|| उंबर,पिंपळ ,जांभूळ,वड | वृक्षांची मुळे,पाने,खोड | फळे आंबट, तुरट गोड | गुणकारी वनौषधी ||१०|| वृक्षांचे जाणावे मोल | कल्पतरू वृक्ष अनमोल | प्राणवायू देती विपुल | शरीरास आरोग्यदायी ||११|| वाढले आता प्रदूषण | न द्यावे एकमेका दूषण | पुढाकार घ्यावा आपण | वृक्षसंवर्धनासाठी ||१२|| |
सुरेश पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम) भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९, Email ID - kharichavata@gmail.com |
बुधवार, ३ जून, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा