बुधवार, ३ जून, २००९

मी आधार (Thane) संस्थेला भेट दिली आणि तिथे असलेल्या मुलांची कामे पाहिली. त्यांच्या बुद्धीमत्तेनुसार ते करत असलेली कामे हि कौतुकास्पदच आहेत हे जाणवले. त्यामुळे त्यांच्यावर हि कविता लिहिण्याचे मला सुचले. हि कविता त्यां मुलांना सप्रेम समर्पित.
हि कविता आधार संस्थेच्या  एप्रिल २०११ च्या 
विशेषांकात प्रकाशित झाली आहे.

|| मतिमंद असता नसतो अंधार ||

मतिमंद आता नाही निराधार
आहे  संस्था  त्यांची आधार
जीवनात उघडले आनंदाचे दार
आहे मतिमंदांचे घर आधार ||१||

मतिमंदांचा  मार्ग  खडतर
आधार असता होईल सुखकर
मदतीचा त्यांना देता हात
मजेत,सुखाने चालतील वाट ||२||

“आधार” त्यांची आहे शाळा
वेळ जातो मजेत सगळा
नका समजू तयांस वेगळा
सोडा त्याला जरा मोकळा ||३||

शाळेने दिला त्यांना आधार
प्राप्त झाला जीवनास आकार
मतिमंद असता नसतो अंधार
त्याची मेणबत्ती सर्वांस आधार ||४||

“आधार” त्यांचे आहे जग
काय कमी जीवनात मग
पणती एक अंधारात जशी
शाळा आधार जीवनात तशी ||५||

तोही बनवितो पिशवी कागदाची
तोही घेतो काळजी निसर्गाची
नाही गिळत भाकरी फुकाची
त्यालाही जाण आहे कष्टाची ||६||

सुरेश पित्रे.
"वैद्य सदन ", पहिला मजला,राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र.-४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ , ०२२ – २५३२६४२९,  भ्रमणध्वनी  -  ९००४२३०४०९      
Email ID – kharichavata@gmail.com 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा