|| विजयपताका उंच फडकवा ||
| |
आला आला गुढी पाडवा
प्रत्येकाने संकल्प करावा
असत्त्यास थारा न द्यावा
सत्त्याचा झेंडा हाती घ्यावा ||१||
मुलांनी छोटे रोप लावा
वनौषधींचा महिमा गावा
स्वयंरोजगार निर्माण करावा
औषधींचा उद्योग करावा ||२||
जपेल माणूस वृक्षास जेव्हा
जगेल माणूस लक्षात ठेवा
वृक्ष अनमोल ठेवा जपावा
एक तरी वृक्ष वाढवावा ||३||
पाणी वीज पेट्रोल वाचवा
चालणे व्यायाम अवलंबावा
पावसाचे पाणी साठवा
निसर्ग छान पुन्हा बहरावा ||४||
सौर उर्जेचा वापर करावा
प्लास्टीकचा पुनर्वापर करावा
शून्य कचरा उपाय करावा
कच-यापासुनी खत बनवा ||५||
चंगळवाद दूर दूर ठेवा
व्यसनापासुनी मुक्ती मिळवा
माणसाचा पशु न बनावा
संस्कारक्षम माणूस घडावा ||६||
उपभोगवाद कमी करावा
समाजात सुसंवाद असावा
अन्यायाविरुद्ध लढा द्यावा
विजयपताका उंच फडकवा ||७||
| |
सुरेश पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम)
भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९,
Email ID - kharichavata@gmail.com
|
शनिवार, ४ जून, २०११
महाराष्ट्र मंडळ शिकागो तर्फे प्रकाशित
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा