हि कविता खाली दिलेल्या संकेत स्थळावरही आहे.
|| "मे " ची सुट्टी || शेवटचा पेपर सुरु , लागली आता सुट्टी मैदानात उतरू, विसरून जाऊ कट्टी ||१|| या सर्वांनी करू , सर्वांशी आता बट्टी , भांडण सारे विसरू , मारू आपण मिठी ||२|| परीक्षा आज संपे , सोडून देऊ तंटे , खेळूया सारे संगे , खाऊ गोड गोड आंबे ||३|| मामा कैरी पाडी , कैरीच्या खाऊ फोडी , संपली बाराखडी, चला खाऊ आंबावडी ||४|| बाल नाट्य पाहू, हिमगौरी सात बुटके, उन्हात नका जाऊ , पायास लागती चटके ||५|| मिळूनी सारे सगळे, पाहू रानी वनी बगळे , उन्हाने घाम निथळे , खाऊ थंड थंड गोळे ||६|| मैना राघू काऊ , छान छान पक्षी पाहू , गार शहाळे पिऊ , उन्हाळा पळवून लाऊ ||७|| खाऊया गुलकंद , वाटेल थंड थंड , राहू नका मंद , जपावे थोडे छंद ||८|| बालगोष्टी वाचू , आनंदे सारे नाचू , गंप्या आणि गणू , बालगाणी म्हणू ||९|| विसरा फळा खडू , बॅट चेंडू काढू , काच नका फोडू , मिळेल धम्मक लाडू ||१०|| सारे मिळून खेळू , नका कोणास वगळू , मुलानो आता पळू , पकडा पकडी खेळू ||११|| टीव्ही कमी पाहू , खेळायला आपण जाऊ , कार्टून मुखवटे बनवू, आनंदे बागडू गाऊ ||१२|| झाडेच झाडे लावू , फुलांची बाग फुलवू , पायी चालत जाऊ, प्रदूषण ते थांबवू ||१३|| ठकू आणि सखू , फणस गरे चाखू , चेंडू घेउनी फेकू , लाल मातीत माखू ||१४|| संपेल "मे " ची सुट्टी, घेऊ पेन्सिल पाटी, घेऊन फुटपट्टी , लागेल आई पाठी ||१५|| सुरेश पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम) भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९, Email ID - kharichavata@gmail.com |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा