मी आधार (Thane) संस्थेला भेट दिली आणि तिथे असलेल्या मुलांची कामे पाहिली. त्यांच्या बुद्धीमत्तेनुसार ते करत असलेली कामे हि कौतुकास्पदच आहेत हे जाणवले. त्यामुळे त्यांच्यावर हि कविता लिहिण्याचे मला सुचले. हि कविता त्यां मुलांना सप्रेम समर्पित. हि कविता आधार संस्थेच्या एप्रिल २०११ च्या विशेषांकात प्रकाशित झाली आहे. || मतिमंद असता नसतो अंधार || मतिमंद आता नाही निराधार आहे संस्था त्यांची आधार जीवनात उघडले आनंदाचे दार आहे मतिमंदांचे घर आधार ||१|| मतिमंदांचा मार्ग खडतर आधार असता होईल सुखकर मदतीचा त्यांना देता हात मजेत,सुखाने चालतील वाट ||२|| “आधार” त्यांची आहे शाळा वेळ जातो मजेत सगळा नका समजू तयांस वेगळा सोडा त्याला जरा मोकळा ||३|| शाळेने दिला त्यांना आधार प्राप्त झाला जीवनास आकार मतिमंद असता नसतो अंधार त्याची मेणबत्ती सर्वांस आधार ||४|| “आधार” त्यांचे आहे जग काय कमी जीवनात मग पणती एक अंधारात जशी शाळा आधार जीवनात तशी ||५|| तोही बनवितो पिशवी कागदाची तोही घेतो काळजी निसर्गाची नाही गिळत भाकरी फुकाची त्यालाही जाण आहे कष्टाची ||६|| सुरेश पित्रे. "वैद्य सदन ", पहिला मजला,राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र.-४००६०१ संपर्क - ०२२ - २५३३३८६९ , ०२२ – २५३२६४२९, भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ Email ID – kharichavata@gmail.com |
बुधवार, ३ जून, २००९
|| वृक्ष आपला सखा मित्र || |
वाढले जागतिक तापमान | बिघडले सृष्टीचे तानमान | पर्यावरणाचे ठेवावे भान | एकविसाव्या शतकात ||१|| वडाच्या फांद्या तोडणे | मुळाविना फांदी पूजणे | वृक्षसंपदा ओरबाडणे | हे तर महापाप ||२|| वृक्षतोड करू नये | चुकीची प्रथा पाडू नये | फांदी वडाची तोडू नये | पूजा करण्यासाठी ||३|| वृक्ष लावावे सर्वत्र | वृक्ष आपुला सखा मित्र | वटवृक्षाचे लावूनी चित्र | पूजा करावी ||४|| बीज जमिनीत पेरावे | एक तरी रोप लावावे | झाड जीवापाड जपावे | भावी पिढीसाठी ||५|| वृक्षांचे उपकार थोर | पण अधाशी चंदनचोर | करती पाप ते घोर | वृक्ष तोडण्याचे ||६|| वृक्षांचे नको कुंडीत रोपटे | वृक्ष नसावे बोन्साय खुरटे | वृक्ष नसता पाणी आटते | दुष्काळ पडतो ||७|| प्राणसखा वृक्ष आपुला | सर्वस्व अर्पितो मानवाला | तरी कृतघ्न माणूस झाला | वृक्ष जाळूनी ||८|| आंबा,फणस वृक्ष सगळे | वृक्ष देती गोड फळे | फुलांमधून मध मिळे | शोषते मधमाशी ||९|| उंबर,पिंपळ ,जांभूळ,वड | वृक्षांची मुळे,पाने,खोड | फळे आंबट, तुरट गोड | गुणकारी वनौषधी ||१०|| वृक्षांचे जाणावे मोल | कल्पतरू वृक्ष अनमोल | प्राणवायू देती विपुल | शरीरास आरोग्यदायी ||११|| वाढले आता प्रदूषण | न द्यावे एकमेका दूषण | पुढाकार घ्यावा आपण | वृक्षसंवर्धनासाठी ||१२|| |
सुरेश पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम) भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९, Email ID - kharichavata@gmail.com |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...