मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

कमीत कमी खाऊन देवाचे नामस्मरण , पोथी वाचन किंवा काहीतरी त्या दिवशी समाज उपयोगी काम करणे असा उपवास करायला पाहिजे

एकाने फेसबुकवर लिहिले होते कि साबुदाणा खाऊ नका , त्या विषयावर लिहिलेले थोडे. 
मी एक ध्वनिचित्रफीत पाहिली ती इथे शेअर केली आहे , ज्यात साबुदाणा कसा 
बनतो त्या कारखान्याचे start to end चित्रीकरण दिले आहे , त्यात मला काही गैर 
वाटले नाही कारण मोठ्या प्रमाणावर एखादी वस्तु निर्माण करायची झाली तर 
असेच बनवावे लागते , हा पूर्वी काही चित्रफिती पाहिल्या होत्या ज्यात 
अळ्या वगैरे होतात असे दाखविले होते , पण असे ह्या चित्रफितीत तर दिसत नाही 
आणि हे झाले साबुदाण्याचे पण सर्वच गोष्टी मोठ्या प्रमाणात पॅकिंग वगैरे करायच्या 
झाल्या तर असे यंत्रावर बनवावे / करावे लागते , आणि मुख्य मुद्दा हा आहे कि उपवासाच्या 
नावाखाली लोक एकादशी दुप्पट खाशी असे करतात ते चुकीचे आहे, 
आता मुख्य गोष्ट खरे उपवास म्हणजे काय ? उप म्हणजे देव आणि त्याचा वास 
म्हणजे त्याची आठवण किंवा उपस्थिती वाटेल असे काही नामस्मरण करणे 
आणि ते करताना आनंद होऊन इतकं रंगून जाणे कि आपल्याला खाण्यापिण्याची 
आठवण सुद्धा होणार नाही , तो झाला खरा उपवास असा उपवास करणारे किती असतील 
ते देवाचं जाणो , पण कमीत कमी खाऊन देवाचे नामस्मरण , पोथी वाचन किंवा 
काहीतरी त्या दिवशी समाज उपयोगी काम करणे असा उपवास करायला पाहिजे 
मग तेव्हा तुम्ही काहीही खा तिथे काय खाल्ले ह्याला महत्व नाही , शेगावच्या गजानन महाराजांनी कांदा भाकर 
झुणकाच मागितले होते, पण आज त्यांच्या नावाने किती मोठे समाजकार्य चालु आहे. 
कांदा लसूण हे तामसिक आहारात मोडते त्यामुळे ते आपण उपासाला टाळायचे , 
गजानन महाराज हे सत्व रज तमाच्या पलीकडे पोचलेले सिद्ध साधु होते , 
त्यामुळे उप = देव , वास = देवाची आठवण सतत ठेवणे 
ह्या अर्थाने उपवास होणे गरजेचे आहे , मग तुम्ही काय खाता ह्याला महत्व नाही 
आणि शास्त्रीय दृष्ट्या पाहिले तर जे तुम्ही नेहमी खाता त्यात पोटाला थोडा बदल म्हणून 
काहीतरी वेगळे खाणे किंवा पोटाला आरामदायक होईल असे खाणे म्हणजे फक्त दूध किंवा 
फलाहार , पण म्हणून दूध + फलाहार हे टाळावे कारण काही आंबट फळे दुधाबरोबर खाणे 
हा विरुद्ध आहार आहे. काही भागाप्रमाणे उपवासाचे पदार्थ बदलतात , गोव्याला नेहमी 
आहारात भात असतो , मग ते काय करतात उपासाला मुगाची खिचडी खातात किंवा उपासाला 
भाजून मग शिजविलेले अन्न चालते , म्हणजे ह्यातही सायन्स आहे कि भाजल्यामुळे 
ते अन्न आणखी पचायला हलके होते जेणेकरून तुम्हीं पोथी वगैरे वाचताना पोट 
बिघडायला नको , किंवा एका दुसऱ्या पद्धतीने असेही आहे असे म्हणतात कि 
दिवसभर उपास करून काहीजण पोथी वाचन करतात मग त्यांना जास्त ऊर्जेची नंतर 
गरज असते म्हणून बटाटा , रताळे हे पदार्थ ती उणीव लगेच भरून काढतात आणि ताकद 
देतात instant energy . आणि उदर भरणं नोहे जाणिजे यज्ञ कर्म हे जो रोज पाळतो 
त्याला खरे म्हणजे उपवासाची गरजच नाही . 
धन्यवाद,
सुरेश पित्रे , ठाणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा