मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

कमीत कमी खाऊन देवाचे नामस्मरण , पोथी वाचन किंवा काहीतरी त्या दिवशी समाज उपयोगी काम करणे असा उपवास करायला पाहिजे

एकाने फेसबुकवर लिहिले होते कि साबुदाणा खाऊ नका , त्या विषयावर लिहिलेले थोडे. 
मी एक ध्वनिचित्रफीत पाहिली ती इथे शेअर केली आहे , ज्यात साबुदाणा कसा 
बनतो त्या कारखान्याचे start to end चित्रीकरण दिले आहे , त्यात मला काही गैर 
वाटले नाही कारण मोठ्या प्रमाणावर एखादी वस्तु निर्माण करायची झाली तर 
असेच बनवावे लागते , हा पूर्वी काही चित्रफिती पाहिल्या होत्या ज्यात 
अळ्या वगैरे होतात असे दाखविले होते , पण असे ह्या चित्रफितीत तर दिसत नाही 
आणि हे झाले साबुदाण्याचे पण सर्वच गोष्टी मोठ्या प्रमाणात पॅकिंग वगैरे करायच्या 
झाल्या तर असे यंत्रावर बनवावे / करावे लागते , आणि मुख्य मुद्दा हा आहे कि उपवासाच्या 
नावाखाली लोक एकादशी दुप्पट खाशी असे करतात ते चुकीचे आहे, 
आता मुख्य गोष्ट खरे उपवास म्हणजे काय ? उप म्हणजे देव आणि त्याचा वास 
म्हणजे त्याची आठवण किंवा उपस्थिती वाटेल असे काही नामस्मरण करणे 
आणि ते करताना आनंद होऊन इतकं रंगून जाणे कि आपल्याला खाण्यापिण्याची 
आठवण सुद्धा होणार नाही , तो झाला खरा उपवास असा उपवास करणारे किती असतील 
ते देवाचं जाणो , पण कमीत कमी खाऊन देवाचे नामस्मरण , पोथी वाचन किंवा 
काहीतरी त्या दिवशी समाज उपयोगी काम करणे असा उपवास करायला पाहिजे 
मग तेव्हा तुम्ही काहीही खा तिथे काय खाल्ले ह्याला महत्व नाही , शेगावच्या गजानन महाराजांनी कांदा भाकर 
झुणकाच मागितले होते, पण आज त्यांच्या नावाने किती मोठे समाजकार्य चालु आहे. 
कांदा लसूण हे तामसिक आहारात मोडते त्यामुळे ते आपण उपासाला टाळायचे , 
गजानन महाराज हे सत्व रज तमाच्या पलीकडे पोचलेले सिद्ध साधु होते , 
त्यामुळे उप = देव , वास = देवाची आठवण सतत ठेवणे 
ह्या अर्थाने उपवास होणे गरजेचे आहे , मग तुम्ही काय खाता ह्याला महत्व नाही 
आणि शास्त्रीय दृष्ट्या पाहिले तर जे तुम्ही नेहमी खाता त्यात पोटाला थोडा बदल म्हणून 
काहीतरी वेगळे खाणे किंवा पोटाला आरामदायक होईल असे खाणे म्हणजे फक्त दूध किंवा 
फलाहार , पण म्हणून दूध + फलाहार हे टाळावे कारण काही आंबट फळे दुधाबरोबर खाणे 
हा विरुद्ध आहार आहे. काही भागाप्रमाणे उपवासाचे पदार्थ बदलतात , गोव्याला नेहमी 
आहारात भात असतो , मग ते काय करतात उपासाला मुगाची खिचडी खातात किंवा उपासाला 
भाजून मग शिजविलेले अन्न चालते , म्हणजे ह्यातही सायन्स आहे कि भाजल्यामुळे 
ते अन्न आणखी पचायला हलके होते जेणेकरून तुम्हीं पोथी वगैरे वाचताना पोट 
बिघडायला नको , किंवा एका दुसऱ्या पद्धतीने असेही आहे असे म्हणतात कि 
दिवसभर उपास करून काहीजण पोथी वाचन करतात मग त्यांना जास्त ऊर्जेची नंतर 
गरज असते म्हणून बटाटा , रताळे हे पदार्थ ती उणीव लगेच भरून काढतात आणि ताकद 
देतात instant energy . आणि उदर भरणं नोहे जाणिजे यज्ञ कर्म हे जो रोज पाळतो 
त्याला खरे म्हणजे उपवासाची गरजच नाही . 
धन्यवाद,
सुरेश पित्रे , ठाणे 

NARMADA POEM IN HINDI - POET SURESH PITRE, THANE

नर्मदेचे काव्य गाणे  - हिंदीमध्ये आज अचानक नर्मदेच्या प्रवाहा सारखे
शब्द काव्य रुपात प्रगट झाले / सुचले आहे. पण हे चालीत म्हणून दाखविल्याशिवाय 
कदाचित कळणार नाही कि हे बरोबर झाले आहे का ? तसेच शेवटी ईकरांती शब्द 
करण्यासाठी काही ठिकाणी वाक्य रचना त्याप्रमाणे केली आहे , काही बदल करण्यासारखे 
किंवा चुकीचे असले तर सांगा , कारण काही मराठीच शब्द आपण चुकून हिंदी समजून 
वापरतो , म्हणजे माझे तरी हिंदी इतके चांगले नाहीये , पण हिंदीत किंवा मराठीत 
बरेच ठिकाणी संस्कृत शब्द येतात तसे इथे काही घेतले तर चालेल का ? साधारणपणे 
ह्या लिंकवर जे आहे , त्या चालीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे 
http://kavyashilpi.blogspot.in/2016/08/blog-post_16.html

शिवपुत्री नर्मदा शिवजटा से तुम प्रगटी  
(शिव घर्म से प्रगटी, कहलाई शिवपुत्री )
नाम मेकलसुता, मेकल पर्वत से बहती 
बगिया मे सखी गुलबकावली से खेलती 
शत शत नमन मेरा नर्मदा तुमको देवी  - १

बूंद बूंद उछलती, नृत्त्य करती नर्तकी  
बन बन घाट घाट से आगे है माँ चलती 
पाप धोती तुम सबका आनंद तुम देती 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी - २

पर्वत फोडकर खन खन निनाद करती 
शिवकन्या नागदेवी नागरूप मे रहती
नर्मदा माँ तुम नर का मद हरण करती  
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी - ३

हे नर्मदा देवी सुख तुम हर क्षण देती 
उपनदिया हँसते आकर तुम्हे मिलती 
नर्मदा देवी, नर को नम्रता तुम सिखाती  
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - ४

विंध्याचल स्पर्श कर आती वेग से बहती    
पत्थर शंकर बनाती समुद्रसे जा मिलती 
नर्मदा तुम अमर युगों युगों से बहती 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी - ५

कई वर्ष तप करती शिव से आशिष पाती 
पंचायतन समेत अपने में धारण करती  
कंकर को स्पर्श कर शिवरूप तुम हो देती 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी - ६

गंगा-यमुना बादमे पहले से तुम बहती 
अमरकंठ प्रगट स्थान बालरूप में रहती 
मेकल पर्वतसे निकली रुद्रदेह से प्रगटी 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - ७

सातपुड़ा विंध्याचल बिचमेंसे तुम बहती 
भेड़ा घाट में गिरती धुवाँधार नाम लेती 
संगेमरवर को फोड़ती प्रबल वेगसे बहती 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - ८

अमरकंठ में प्रगटी अरब सागर से मिलती
पादतल मेकल पर्वत मंडला है पादसंधी
जानु है भेड़ाघाट संगेमरवर की पहाड़ी 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - ९

उदर महेश्वर है और ओंकारेश्वर है कटी 
नेमावर नाभिस्थान मध्य माँ तुम रहती  
ह्रदय शूलपाणेश्वर मुख तुम्हारा करनाळी 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - १०

भ्रूमध्य कोरल , भड़ोच मस्तक विराजी 
शिखा हरी का धाम , नर्मदा पावन भूमी 
घाट घाट तुम बहती नूतन दर्शन देती  
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - ११

स्वर्ग से हो तुम आयी पाप सबका धोती 
मध्य, महाराष्ट्र गुजरात से तुम बहती 
देव मुनी संतनकी पावन कर तपोभूमी 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - १२

नर्मदा के दोनों तट है पावन तीर्थस्थली 
गाय जैसे बछड़े को स्तन्यपान है करती 
परिक्रमावासी को माँ भी है वैसे खिलाती 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - १३

मछली मगर नाग पशु, लीन है तव पदी
कितने घने जंगल घास और हरियाली 
पक्षी विविध गूंजते है निर्मल मैया नदी 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - १४

इस भव का पाप ताप सब तुम है धोती 
वशिष्ठ पिप्पल कर्दम, कितने थे ऋषी
तेरे तटपर रहते थे ज्ञान सुधर्म रीती   
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - १५

मृत्त्यु बने भाग्यदायी ऐसी पावन है भूमी
शांत करने ताप भव का तुम नर्मदा नदी   
पाप धोने तुम प्रगटी तुम हो पापनाशिनी  
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - १६

तुम हो मगर वाहिनी, तुम हो ताप हारिणी
तुम हो पाप नाशिनी, तुम हो पुण्य दायिनी 
तुम हो दुःख हारिणी, तुम हो सुखदायिनी 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - १७

सब नदिया है लेकिन, तुम्हरे जैसे कोई नहीं 
गंगा मैया अपने पाप धोने यहाँ है आती 
संगम यहाँ कितने नदिया आकर मिलती 
शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - १८

शत शत नमन माते नर्मदा तुमको देवी  - धृ ?

माते हा शब्द जास्त बरा वाटतो कारण मेरा ह्या शब्दात गर्व वाटतो 
कारण असे म्हणतात कि परिक्रमेत मी, माझे असा मी पणा दाखवायचा नसतो. 
अर्थात लहान मुलाला जशी आपली आई प्रिय असते , हवी असते ताशा भावनेने 
हा मेरा शब्द वापरला आहे त्यात तो गर्वाचा मीपणा नाही  

शत शत नमन मेरा तुमको नर्मदा देवी  - धृ ?
शत शत नमन मेरा तुमको माँ हे देवी  - धृ ?
बार बार नमन मेरा तुमको मकर वाहिनी ? - धृ ?
शत शत नमन मेरा तुमको मकर वाहिनी  - धृ ?
नमोस्तु मात नर्मदे नमो मकर वाहिनी ? - धृ 
नमामि मातु नर्मदे नमो मकर वाहिनी ? - धृ 
नर्मदे हर पाहि माम् नर्मदे हर रक्ष माम् ? - धृ 

- सुरेश पित्रे , ठाणे , MAHARASHTRA

मंगळवार, ३ जानेवारी, २०१७

Pt. Sushil Semwal: ।। पृथिवी पूजन ।।

Pt. Sushil Semwal: ।। पृथिवी पूजन ।।: ॐ पृथिवीति मन्त्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः , सुतलं छन्दः , कूर्मो देवता , आसनपवित्रकरणे विनियोगः । ॐ पृथ्वि ! त्वया धृता लोका देवि ! त्व...