|| कुत्र्यांची कथा , कुत्र्यांची व्यथा ||
बेसुमार झाडे कापली | गावांची शहरे झाली |
अनिर्बंध शहरे वसली | भारत देशामधे ||१||
कुत्र्यांची संख्या वाढली | कुत्र्यांची समस्या वाढली |
माणसे बेजार झाली | कुत्र्यांच्या चावण्याने ||२||
कुत्रे बेवारस हिंडती | मोठया आवाजात भुंकती |
रात्री पाठलाग करती | शहरात समूहाने ||३||
दुचाकीमागे धावती | सुसाट वेगे पळती |
पोटरीचा लचका तोडती | भुकेले कुत्रे ||४||
भटके कुत्रे मोकाट फिरती | उन्हाने त्रस्त होती |
तहानेने व्याकुळ होती | उन्हाळ्यात शहरामधे ||५||
कच-यांत अन्न शोधती | पाण्यासाठी वणवण फिरती |
पाण्याविना भैसाटून धावती | शहरातले कुत्रे ||६||
कुत्रे मोकाट हिंडती | सैरावैरा धावत सुटती |
कधी पिसाळून चावती | रस्त्यांवर माणसांना ||७||
पूर्वी टुमदार वाडे होते | कुत्र्या,मांजरांचे आसरे होते |
खाऊन पिऊन तृप्त होते | सगळे मांजर, कुत्रे ||८||
माणसे गाडी चालवती | कुत्रे रस्त्यात चिरडती |
तरी स्वतःस माणूस म्हणती | मद्यधुंद राक्षस ||९||
मस्तीखोर दगड मारती | कुत्र्याचे डोके फोडती |
जनावरांस रक्तबंबाळ करती | खुनशी माणसे ||१०||
पिसाळलेले कुत्रे चावती | रेबीज आजाराची भिती |
चावता इंजेक्शनची निश्चिती | खर्चिक आणि कष्टदायी ||११||
कुत्र्यांची समस्या जाणावी | माणुसकीने कारवाई करावी |
कुत्र्यांची संख्या घटवावी | वैद्यकीय उपायाने ||१२||
सरकारने योजना राबवावी | रेबीजची लास टोचावी |
कुत्र्यांची समस्या सोडवावी | सर्व शहरामधे ||१३||
जर सरकारला कुत्र्यांचा कळवळा | तर बांधाव्या श्वानशाळा |
रस्ता करावा लवकर मोकळा | कुत्रामुक्त करा हो शहरे ||१४||
कवी / प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता - " वैद्य सदन ", राघोबा शंकर रोड, चेंदणी, ठाणे (पश्चिम) ,
पिन कोड क्र. - ४००६०१ , संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा