गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

|| कांद्याची हि तिखट कहाणी ||

कांदा रखडून पडून सडला 
निर्यात बंदीचा डाव थाटला 
सभा चर्चेचा खेळ मांडला 
पहा पहा तो कांदा सडला ||१||
शेतकरी ओरडून सांगू लागला 
निर्यात बंदी उठवा म्हणाला 
प्रश्नावर तोडगा नाही निघाला 
पहा पहा तो कांदा सडला ||२||
कांद्याचा भाव पुन्हा कडाडला 
शेतकरी देशोधडीला लागला 
तिखट कांद्याचा वांदा झाला 
पहा पहा तो कांदा सडला ||३||
सामान्य माणूस बेजार झाला 
सरकार मायबाप निर्दयी बनला 
चर्चा करुया फक्त म्हणाला 
पण केव्हाचा कांदा सडला ||४||
उमेदवार लोकांनी निवडून दिला 
वातानुकुलीत गाडीत फिरला 
शेतकरी देशाचा उन्हात राबला
मातीत राबुनी खपून गेला ||५||
कांद्याचा सडून झाला वांदा 
डोळ्यात पाणी आणतो कांदा 
कांद्याची हि तिखट कहाणी 
लोकांच्या डोळ्यात आणते पाणी ||६||
कवी - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, 
राघोबा शंकर रोड, चेंदणी, ठाणे (पश्चिम) , 
पिन कोड क्र. - ४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ , 
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           
Email ID - kharichavata@gmail.com





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा