नमस्कार , आजच्या युगांत सर्वत्र पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्या विषयाला धरून हि रचना आहे , पण ती लोकसत्ताच्या कोणत्या ईमेल आयडीवर पाठवायची कळत नाहीये हि रचना तुम्हाला नाकारता येणार नाही अशीच झाली आहे त्याचे सर्व श्रेय हे श्री रामदास स्वामी ह्यांचे आहे असे मी मानतो , कारण त्यांच्या ''मना सज्जना भक्ती पंथेची जावे | '' ह्याच चालीमध्ये ती रचना झाली आहे त्याचे पाच श्लोक आधी पाठवितो आहे , आपण योग्य ईमेल आयडी सांगितला तर मला संपूर्ण रचना तिथे पाठविता येईल. - सुरेश रघुनाथ पित्रे, चेंदणी, ठाणे 5/12/2018
अरे ! थेंब तो थेंब पाणी साठवा ।
तलाव पाण्याचा असा तो भरावा ।
तलावांतील गाळ तो उपसावा ।
तलावांत स्वच्छ जल हे साठवा ।।१।।
अहो लोकहो पाणी ते अडवा हो ।
अहो जनहो पाणी ते साठवा हो ।
नको दुष्काळ तो उपाय बरवा ।
पाणी जमिनींत आधी ते जिरवा ।।२।।
आवारात इथें तलाव बांधुया ।
तलावांत पाणी आपणं सोडूया ।
तलावांत हे, पाणी रे साठवुया ।
चला रे पुन्हा हा उपाय करूया ।।३।।
विहिरीतं कचरा टाकू नये तो ।
जल ते प्रदूषीत करू नये हो ।
जलस्रोत पाण्याचे सुकू नये हो ।
नुकसान पाण्याचे करु नये हो ।।४।।
जलसंपदा हि जतन करूया ।
पुन्हां विहिरींचे पाणी वापरूया ।
उपसा तो नित्य आपण करूया ।
जलशुद्धी तेणे ती साध्य करूया ।।५।।
जर हा पाण्याचा झरा आटला हो ।
जीवन प्रवांस मग संपला हो ।
विचार जयांस भला पटला हो ।
शहाणा खरा तो माणूस जाणा हो ।।६।।
पाणी ते माणसां बहुमूल्य आहे ।
पाणी ते माणसां उपयोगी आहे ।
पाणी ते सर्वांस समान मिळावें ।
पाणी हे जीवन जीवांस मिळावें ।।७।।
बदा बदा पाणी हे ओतू नये हो ।
अपव्यय पाण्याचा करू नये हो ।
थेंबहि पाण्याचा दवडू नये हो ।
पाणी हे जीवन विसरू नये हो ।।८।।
पाण्यानें आपलीं तहान भागतें ।
पाण्यानें सर्वांसाठी अन्न पिकतें ।
अन्नानेच सर्वांची भूक भागतें ।
पाण्यानें जीवांची तहान भागते ।।९।।
झाडासाठी हे छोटें रोप लावतां ।
रोपांवर पाणी थोडे शिंपडता ।
रोपांचा मग मोठा वृक्षही होतां ।
सावली पांथस्था मिळे येतां जातां ।।१०।।
नेहमीच बीज हे पेरीत जावें ।
तयानेंच वन हे वाढत जातें ।
वनें रोखती धूप हि जमिनीची ।
वनाने वाढतें पातळी पाण्याची ।।११।।
वनाने वाढतो प्राणवायुचा साठा ।
वनाने मिळे जळण लाकूड फाटा ।
करावें आपण जल संधारण ।
करावें आपण वनं संरक्षण ।।१२।।
आला हो आला हो कठीण तो काळ ।
पहावें तिकडे पाण्याचा दुष्काळ ।
नाही मुरविलें पाणी ते आपणं ।
तयाने भोगतो दुष्काळ आपणं ।।१३।।
मोठालीं मोठालीं धरणें बांधलीं ।
तयाने भुकंपे धरणीं कांपली ।
अधाशा सारखी धरणी लुटली ।
तयानेच आतां अशी वेळ आलीं ।।१४।।
छतांचे ते पाणी मुरवीत जावें ।
अशा रीतीने पाणी ते साठवावे ।
भूमी कोरडी पाणी जाते खाडीतं ।
नको खाडीतं ते मुरवु भूमीतं ।।१५।।
पावसांचे हे पाणी जातें खाडीत ।
तेच आधी हो मुरवा ते भूमीत ।
गोडं पाणी तुम्ही मुरवीत जातां ।
दुष्काळ तुमचा पळेल तो आतां ।।१६।।
भूमीतून पाणी तुम्हां ते मिळेल ।
भरघोस शेतं तुमचे पिकेल ।
दुष्काळ तुमचा पळून जाईल ।
विश्वच अवघें आनंदी होईल ।।१७।।
तुझ्या संकटां तूंच रे कारण तो ।
दुष्काळ पडला तुझ्या कारणे तो ।
पृथ्वीच आता हि संकटीं पडलीं ।
तयानेंच हि मृत्त्यू घंटा वाजली ।।१८।।
कृषि आणि ऋषी संस्कृती सोडली ।
तयानेंच आज विकृती दिसली ।
विश्वच अवघें संकटीं पडलें ।
जण हे जग हे शांतींस मुकलें ।।१९।।
दिसेना सुकाळ त्सुनामीं दुष्काळ ।
असा आज आला कठीण तो काळ ।
अरे संकटांत नवजांत बाळ ।
नव्हे त्याचा दोष कलियुग काळ ।।२०।।
आह्मी दूर केली गोमाता आपली ।
अधाशासारखी खतें हि टाकली ।
रासायनिक ती खतें हो घातक ।
म्हणूनच भूमी झाली नापीक ।।२१।।
गोमाता देते शेण मूत्र फुकट ।
तयाचा वापर करणें फुकट ।
नको ती महाग नको रसायनं ।
गोमाता सुधन फुकट साधन ।।२२।।
नको ट्रॅक्टर तो पुन्हा बैल आणा ।
असा सुवर्णं तो पुन्हा काळ आणा ।
गोधन संपत्ती खरी रे संपत्ती ।
नको रसायनं नको रे विकृती ।।२३।।
धान्य ते पिकवा पोट भरण्या ।
नका ते विकू धान्य धन भरण्या ।
तयानेंच हा घात सर्वत्र झाला ।
तयानेंच हा काळ कठीण आला ।।२४।।
विचार करा तो जरा गांभीर्याने ।
कृती त्यांवर ती करा हो त्वरेनें ।
गुरु रामदास तयांसी नमितो ।
रघुनाथसुत हे काव्य लिहितो ।।२५।।
- सुरेश रघुनाथ पित्रे, चेंदणी, ठाणे