नमस्कार ,
सुरुवातीला
ओवीबद्ध अर्धे लिहून झाले होते पण मग अचानक पुन्हा अभंगात
लिहावे असेच
वाटायला लागले , मग तसेच लिहिले - श्रीदत्त गुरूंची इच्छा
आता ह्यावर्षी
गिरनार परिक्रमा करण्याची इच्छा आहे , त्याआधीच हे लिहून झाले आहे. पाच टप्प्यात हि यात्रा होते तसे मधे विभाग केले आहेत.
जय हो जय हो /
गिरी नारायण - अभंग ६/६/६/६
गजानन आता /
प्रथम वंदितो / गिरनार कथा / अशी हि लिहितो //१//
नाही मी पाहिला /
अजून गिरी तो / गद्य ते वाचलें / फक्त इथे आतां //२//
नाही मी पाहिली / पाऊले दत्तांची / आधीच लिहिलें / कसे ते वर्णन //३//
वाचले वर्णन /
गद्य मराठींत / वाटलें लिहावें / तेंच अभंगांत //४//
सद्गुरू प्रेरणा
/ झाली ती मनांत / म्हणून असे हे / लेखन करतो //५//
कुलदेव वंदूं / कुलदेवी वंदूं / सद्गुरु चरण / तसेच ते वंदूं //६//
नमितो शारदा /
काव्याची देवता / नमितो नर्मदा / माय आतां माझी
//७//
सत्व रज तम /
त्रिगुण स्वरूपी / ब्रह्मा विष्णु शिव / दत्तगुरु वंदू //८//
दत्तांच्या
पादुकां / गिरनार स्थितं / लिहितो कथा ती / जय गिरनारी //९//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
गिरनार क्षेत्रीं
/ श्री दत्त गुरूंचे / निवास स्थान हे / पादुका रूपाने //१०//
श्री दत्त
प्रभूंची / पाऊले तिथेच / दर्शनं घेउनी / भक्त होती धन्य //११//
पादुका दर्शनं /
घेण्यासाठी आधी / दहा हजार त्या / चढाव्या पायऱ्या //१२//
पर्वत उत्तुंग /
चढावा लागतो / तेव्हा ते दर्शन / होते पादुकांचे //१३//
भक्तांचा निर्धार / नाही अहंपणा / त्यांच्या तो चित्तांत / भक्तीभावं फक्त //१४//
गिरनार क्षेत्रं / गुजरात इथें / सौराष्ट्र प्रांतात /
जुनागढ पाशी //१५//
मुंबई पासून /
अहमदाबाद / प्रवांस रेल्वेने / हेंच सोयीस्कर //१६//
मग जुनागढ / ते
गिर पायथा / पाच मैलांचा हा / प्रवांस थोडासा //१७//
गिर पायथ्याला /
स्थानीक नावाने / तळेटी हे नाम / असे म्हणतात //१८//
तिथे धर्मशाळा /
जिथे हो मुक्काम / साधु नि संतांचा / भक्त विसावती //१९//
गिरनार इथे / अनेंक शिखरे /
श्रीदत्त शिखरं / जिथे त्या पादुका //२०//
पायऱ्या चढणे /
शिखर गाठणे / अंदाजे असे ते / सहा तांस होती //२१//
पुन्हा उतरणे /
पायथा गाठणे / पुन्हा सहा तांस / तसेच लागती //२२//
दहा हजार त्या /
पायऱ्या चढणे / म्हणून पहाटे / सुरुवात होतें //२३//
प्रथम पायथा /
इथे हनुमंत / मंदिर सुंदर / लंबे हनुमान //२४//
हनुमान भव्य /
मूर्तीचे दर्शन / मंदिरीं घडते / सर्वच भक्तांना //२५//
प्रथम मारुती /
दर्शन करुनि / बळ ते घेउनी / चढाव्या पायऱ्या //२६//
संकट मोचक /
हनुमान इथे / दर्शन छान ते /
मग आरंभ तो //२७//
सद्गुरु स्मरण /
दत्त दिगंबर / नामस्मरण ते / अखंड चढतां //२८//
सुंदर पवित्र /
वातावरण ते / तन मन छान / प्रफुल्लीत होतें //२९//
मोठा तो पल्ला /
एकेक पायरीं / चढतां पाहणे / वानरसेना ती //३०//
दऱ्या खूप खोल / सौंदर्य छान ते / नयनरम्य हा / परिसर छान //३१//
पहिला टप्पा हा /
दोन हजार नि / पाचशे पायऱ्या / होतात ह्या पूर्ण //३२//
इथे खडकांच्या /
गुहेत मूर्ती ह्या / राजा भर्तृहरी / राजा गोपीचंद //३३//
दोन्हीही मूर्ती त्या / आहेत सुंदर / त्यांना ते इथेच / झाले दत्त दर्शन //३४//
दोन्हीही राजांनी
/ गोरक्ष नाथांच्या / आदेशावरून / त्याग मोठा केला //३५//
राजदरबार / सोडून
वैभव / गिरनार इथे / साधनेंस बसलें //३६//
दत्त आदिगुरू /
झाले ते प्रसन्न / साक्षांत दर्शन / इथेच त्यां झालें //३७//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
दुसरा टप्पा तो /
माली परब हा / प्रत्येकाला इथे / मिळते जल हो //३८//
मातीच्या रांजणीं
/ थंडगार पाणी / स्वच्छ सुमधूर / मिळते प्यायला //३९//
अमृतासमान / जल
ते वाटते / प्रवास मग तो / होतो हा सुसह्य //४०//
तिथेच बाजूला /
श्रीराम लक्ष्मण / सीता ह्यांचे तेहो
/ मंदिर ते आहे //४१//
तिसरा टप्पा तो /
तीन हजार नि / पाचशे पायऱ्या / गढी कोट नांव //४२//
इथे तो असा हा /
जैन मंदिरांचा / मोठा तो समूह / पहाया मिळतो //४३//
तयांत प्रमुख /
मंदिरे अशी हो / नेमीनाथ आणि / वृषभदेव ह्यांची //४४//
देवीदेवतांची /
मंदिरे अनेक / लहान मोठी ती / भोवती दिसती //४५//
सर्व मंदिरांची /
आंत नि बाहेर / कलाकुसर ती / सुरेख नि छान
//४६//
कोरीव काम ते /
अप्रतीम असे / सुंदर नक्षीदार / दगड कोरले //४७//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
मग आता येतो /
चवथा टप्पा तो / अंबाजी मातेचा / आदिमाया देवी //४८//
पर्वतावर या /
शक्तीचे मंदिर / पुरातन फार / आहे शक्तीपीठ //४९//
बावन्न देवीची / अशी शक्तिपीठे / तयातील आहे / एक शक्तीपीठ //५०//
अंबाजी मातेची /
मूर्ती भव्य अशी / सुंदर देखणी / नमूं जगदंबा //५१//
तिच्या समोर ते / वाहन मातेचे / सिंह मूर्ती छान / तशीच दिसते //५२//
स्थान हे
अत्त्यंत / आहे हो जागृत / सांगती स्थानिक / महिमा तियेचा //५३//
जशी मुंबईत /
मुंबादेवी खास / तशीच इथे हि / श्री अंबाजी माता //५४//
गुजराती इथे /
पती पत्नी असे / जोडीने येउनी / दर्शन घेतांत //५५//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
पुढे येतो असा /
पाचवा टप्पा तो / गोरक्ष नाथांच्या / पादुका दिसती //५६//
गुरु गोरक्षांनी
/ ह्या पर्वतावर / धुनी पेटवून /
तपश्चर्या केली //५७//
होऊनी प्रसन्न /
श्रीदत्तात्रेयांनी / प्रत्यक्ष त्यांना ते / आलिंगन दिले //५८//
जागेवर त्याच /
गोरक्ष नाथांची / धुनी व पादुका / पहाया मिळती //५९//
गिरनार इथे /
गोरक्ष शिखर / सर्वोच्च शिखर / मानले जाते हो //६०//
पण इथे अशी /
गोष्ट ती अद्भुत / पहाया मिळते / कशी ती पहा //६१//
श्रीदत्त शिखर /
इथून पाहतां / गोरक्ष शिखर / उंच दिसते हो //६२//
गोरक्ष शिखर / इथून पाहतां / श्रीदत्त शिखर / उंच दिसते हो //६३//
गोरक्षांचे तप
/ श्री दत्त पहाती / आशीर्वाद देती / तुझे स्थान ऊंच //६४//
पण गोरक्ष म्हणे
/ विनंती करून / आपण आहांत / गुरुमहाराज //६५//
तेव्हा आपणंच /
रहावे ऊंच ह्या / शिखरीं इथे हो / माझ्यापेक्षा ऊंच //६६//
साधूंच्या तोंडून
/ ऐकल्या गोष्टींचा / प्रत्यय इथे हो / येतो ह्या शिखरीं //६७//
पाहतां दोन्ही हो / आळीपाळीने ते / शिखरें ऊंच ती / दोन्ही हो दिसती //६८//
गोरक्ष शिखरं /
प्रथम दिसतें / मग ते शिखर /
दत्त नामें तेहो //६९//
पायथ्यापासून /
इथपर्यंत ह्या / पायऱ्या अशा हो / दहा हजार त्या //७०//
जातो शीण सारा /
दर्शन होतां ते / पावलांचे इथे / भाविक भक्तांना //७१//
वाटे आपणांस /
आश्चर्य हे झालें / कसा मी आलो हा /
पायऱ्या चढून //७२//
एरवी आपण / चढता
शंभर / पायऱ्या चालून / आपण थकतो //७३//
या अनुभवाने /
प्रचिती गुरूंची / कृपादृष्टीची ती / येतसे वाटते //७४//
मन थक्क होतें / अष्टसात्वीक ते / भाव ते दाटून / येती शरीरांत //७५//
भक्ती भाव असां /
येतो हा दाटून / श्री दत्त चरणी / लोटांगण होतां //७६//
भावविभोर नि /
कृतकृत्त्य वाटें / पावन झाला हा / मानव जन्म हो //७७//
श्री दत्तगुरु जे / आदिगुरू देव / ब्रह्माण्डनायक / सद्गुरू समर्थ //७८//
परम पवित्र /
पावले अशी हि / इथे उमटली / उंच ह्या शिखरीं
//७९//
ते शिखर कसें / ऊंच तो सुळका / बाजूला दगड /
निमुळते असे //८०//
जणू ती रचना /
अशी वाटते हो / कोणत्याही क्षणी / खाली कोसळेल //८१//
जणू चिकटलें /
मोठाले दगड / इथे सुळक्याला / अधांतरी असें
//८२//
खरोखर वाटें /
इथे चमत्कार / पाऊले दिसती / श्रीदत्त पादुका
//८३//
ज्यावेळी
श्रीदत्त / झाले अंतर्धान / तयाची हि खूण / ठसा पावलांचा //८४//
रूप मनोहर / रूप
पादुकांचे / पाहुनी ते भक्त / धन्य धन्य होती //८५//
पुजारी एक ते / पावला जवळी / दुसरे पुजारी / देती हो प्रसाद //८६//
तीर्थ नि प्रसाद
/ गऊ मातेचा तो / देण्यासाठी इथे / पुजारी बसलें //८७//
दोन फुटांवर /
पावलांमागे त्या / त्रिशूल नि झेंडे / एकमेकांस ते //८८//
बांधून असे ते /
असती ठेवले / रोवून असे ते / तिथेच जवळी //८९//
सिमेंटचे दोन /
खांब ते मोठाले / तयावरी घंटा / मोठी टांगलेली //९०//
शिखरावरील हे /
स्थान हे छोटेसे / जेमतेम तीस / माणसे बसती //९१//
आजूबाजूला ते /
निसर्ग सौंदर्य / दिसें मनोहर / शिखरावरून
//९२//
जुनागढचा हा / विस्तीर्ण भाग तो / दिसे परिसर / दूर दूरवर //९३//
प्रभास पाटण /
दूर ते दिसतें / वेरावळचा तो / समुद्रही दिसें //९४//
सभोवताली ते /
विलोभनीय हे / दृश्य हे पाहतां
/ भान हरपते //९५//
श्रीदत्त
प्रभूंच्या / दिव्य चरणांचे / दर्शन घेऊन / खाली उतरतां //९६//
एका कड्यावर /
दत्तधुनी आहे / शिखराजवळ / स्थान ते आहें //९७//
तेथे ते असती / प्रमुख महंत / आणि ते सेवक / अंदाजे दहा हो //९८//
प्रवासी भक्तांची
/ सोय ते करती / प्रसाद भोजन / चहा नि फराळ //९९//
अखंड जळत / चोवीस
तास ती / दत्तधुनी अशी / प्रज्वलीत राहे //१००//
धुनीपासून ती
पायवाट खाली / तिथे उतरतां / कमंडलू कुंड //१०१//
इथे कुंडावर /
सूक्ष्म रूपाने ते / दत्तगुरु नित्य / स्नान हो
करती //१०२//
नित्त्य स्नान
होतां / साधनेंत दत्त / मग्न होती अशी / मिळते माहिती //१०३//
आणखी तिथे ती /
बरीच स्थाने हो / पाहण्या सारखी / गिरनार इथे //१०४//
अतिदुर्गम ते /
जाणे अवघड / शिखर नाम ते / अनुसूया असे
//१०५//
महाकाली माता /
मंदिर तसेच / गोमुखी गंगा / पांडव
गुंफा नि //१०६//
जटाशंकर शिव /
मुचकुंद गुंफा / भरतवन नि / भवनाथ शिव //१०७//
दुग्धेश्वर शिव /
दामोदर कुंड / रेवती कुंड नि / शिलालेख आदी //१०८//
सम्राट अशोक /
ह्याने जे कोरले / ऐतिहासिक ते / शिलालेख पहा //१०९//
दामोदर कुंड /
इथे जवळीच / मोठा तो खडक / भैरवजप नामें //११०//
या खडकांवर /
बसती महात्मे / जप करण्यांस / सूक्ष्म रूपानें ते //१११//
सूक्ष्म रूप असें / अवधूत स्वामी / कोणी ते सांगती / पाहिले असे हो //११२//
स्वानुभूतीपूर्ण
/ लेखांत वाचले / तेच हो कथिले / इथे अभंगात //११३//
नाथ मोक्षकिल्ला
/ नामें एक स्थान / तेही शिखर हे /
इथेच पहावे //११४//
नाथ पंथियांना /
जीवन शिव हे / दर्शन असे हो / झाले असे त्यांना //११५//
निरंजन अशी /
समाधी घेऊन / विलीन सदेह / सूक्ष्मरूप झालें
//११६//
प्रतीक आपलें /
जाण्याचे म्हणून / अनेक चिमटे / तिथे ते रोवले //११७//
जड शरीराची /
निरंजन अशी / समाधी घेऊन / दिव्य देही झालें //११८//
जगाच्या कल्याणा
/ भ्रमण करणे / हाच एकमेवं / उद्देश नाथांचा //११९//
म्हणून अशी हि /
गिरनार भूमी / नाथ पंथियांची / भूमी सर्वश्रेष्ठ //१२०//
श्रीदत्तात्रेयांची
/ तपोभूमी अशी / गिरनार भूमी / पावन हे क्षेत्र //१२१//
नाथ व दत्तांच्या / भक्तांना आदेश / होतात येथुनी / असे गिरनार
//१२२//
अनेक साधुंना /
अनेक संतांना / झाले ते साक्षांत / श्री दत्त दर्शन //१२३//
कोणा कोणांस ते /
झाले ते दर्शन / नांवे त्यांची अशी / पुराण काळांत //१२४//
राजा भर्तृहरी /
राजा गोपीचंद / श्री गोरक्षनाथ / आदि साधु योगी //१२५//
आताच्या काळांत /
साधु रघुनाथ / संत एकनाथ / स्वामी जनार्दन
//१२६//
साधु नारायण / आदि ते अनेक / इंदूर इथले / नाना
महाराज //१२७//
तराणेकर ते /
आडनाव त्यांचे / प्रसाद छडीचा / दिला श्री दत्तानी //१२८//
उल्लेख
त्यांच्याच / मार्तंड महिमा / नावाच्या पोथीत / केला असे तो //१२९//
अनंतकाळ ते /
गिरनार इथे / राहणारे साधु / अजून आहेंत //१३०//
साधु नि महात्मे
/ आजही वास्तव्य / करून आहेंत / गिरनार इथे //१३१//
सभोवती तिथे / संतमहंतांचे / आखाडे आहेंत / आश्रम आहेत //१३२//
वन्यप्राण्यांचे
ते / अभयारण्य हे / नंदन वनही / आहे सभोवती //१३३//
सिंहांची वसती /
असे हे अरण्य / जगात प्रसिद्ध / गिरचे जंगल //१३४//
पूर्वीपासून तो /
पुराण काळात / जो असे वर्णिला / अजून आहे तो //१३५//
विविध प्राचीन /
संस्कृतीचा वसा / असा जो नटला /
पहा गिरनार //१३६//
असा गिरनार /
पाहून भाविक / साधक नि भक्त / सुखावून जातो //१३७//
आत्मशांति लाभ /
खचितच होतो / एक म्हण अशी / आहे प्रचलीत //१३८//
जन्म जाति वाया /
शंभर असे ते / जर ना होईल / गिरनार दर्शन
//१३९//
आणि जो जाऊन / पाही गिरनार / पुनर्जन्म त्यांसी / नाही वारंवार //१४०//
जय हो जय हो /
गिरी नारायण / जय हो जय हो / दत्त गिरनार //१४१//
संक्षिप्त असे हे
/ वर्णन लिहिलें / गिरनार ह्यांचे / असे अभंगांत //१४२//
प्रत्येक खंडांत
/ सहा अक्षरें ती / असा अभंग हा / म्हणती छंद हा //१४३//
आता मज इच्छा /
आहे दर्शनाची / पादुका आपल्या / पहाव्या शिखरीं //१४४//
गिरनार तोही /
पहावा म्हणुनी / परिक्रमा त्याची / वाटते करावी //१४५//
अनुसूया पुत्र /
दत्तगुरु तेहो / स्मर्तृगामी दत्त
/ भक्तवत्सल तें //१४६//
आतां मज द्यावे /
बळ दत्तगुरु / चढण्या गिरी तो / पाहण्या पादुका
//१४७//
शके एकोणीश्शे /
चाळीस सालांत / भाद्रपद कृष्ण / अष्टमी
तिथीला //१४८//
सुरुवात केली /
अभंग रचना / पूर्ण झाले आज / एकादशी
तिथीं //१४९//
प्रेरणा दत्तांची / लेखणी सुरेश / तुम्हीचं लिहिलें / मी तो नाममात्र //१५०//
होतां लेखणींस /
स्पर्श हा आपलां / धन्य धन्य झाला /
रघुनाथसुत //१५१//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
फक्त एकादशी /
अष्टमी तिथीला / केले हे लेखन / दोनच दिवशीं //१५२//
दोन हजार नि /
अठरा साली हे / मांस ऑकटोबर / झाले हे लेखन //१५३//
दोन आणि पाच /
तारीख दिवशी / पूर्णत्वास गेले
/ अभंग लेखन //१५४//
अचानक अशी / झाली
हि प्रेरणा / लिहवीते धनी / दत्तगुरु नाथ //१५५//
लेखन - रघुनाथसुत
(सुरेश पित्रे), चेंदणी ठाणे , महाराष्ट्र
लेखन काळ -
२/१०/२०१८ आणि ५/१०/२०१८