PRESS CTRL KEY AND SCROLL UP THE MIDDLE BUTTON OF MOUSE TO SEE ENLARGED VIEW. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
PRESS CTRL KEY AND SCROLL UP THE MIDDLE BUTTON OF MOUSE TO SEE ENLARGED VIEW. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, १ जुलै, २०११
शनिवार, ४ जून, २०११
|| श्री कृष्ण भगवान की जय || श्री गोमाता की जय||
गाय हिरवा चारा खाते | तोंडामध्ये रवंथ करते | आम्हा सकस दूध देते | आबाल वृद्धांसाठी ||१|| गाय आम्हांस दूध देते | गावक-यांस रोजगार देते | भूकेल्याचे पोट भरते | कामधेनू माता ||२|| जमिनीची करावी मशागत | त्यात मिसळावे शेणखत | पिकेल उत्तम शेत | पारंपरिक पद्धतिने ||३|| शेती करावी शेणखतयुक्त | वापरावे शेणखत फक्त | करावे जमिनीस रसायनमुक्त | सर्व शेतक-यांनी ||४|| अधाशासारखी नसावी भूक | जमीन ठेवावी सुपीक | जमीन होईल नापीक | काही रसायने घातक ||५|| गाय बकरीचे खत | किंवा नैसर्गीक खत | ओल्या कच-यांचे खत | शेतीसाठी वापरावे ||६|| फळे भाज्या गावात पिकती | ट्रक भरभरून शहरात येती | कच-यांचे सर्वत्र साठती | ढीग साली देठांचे ||७|| शहरात हा मुबलक कचरा | त्याचे खातात रुपांतर करा | तेच शेतीसाठी वापरा | उत्तम असे पुनर्वापर ||८|| शहरांत कच-यांचा प्रश्न सुटेल | गावात खताचा प्रश्नं मिटेल | शहर-गावांस आधार मिळेल | एकमेकां सहाय्य करू ||९|| रसायने अती वापरू नका | जमिनीचा कस घालवू नका | जीव धोक्यात घालू नका | समस्त जीवजंतूंचा ||१०|| गाई म्हशी दूध देती | बैल शेतामध्ये राबती | उभे आयुष्य अर्पण करती | मानवजातीसाठी ||११|| गाय,बैल म्हातारी होता | न द्यावे त्यासं मारण्याकरिता | माता पित्यासम सांभाळता | पुण्य लाभेल ||१२|| गुरेढोरे होता निकामी | त्यांना पाहिजे चाराभूमी | दान देऊनी तुम्ही आम्ही | निर्माण करावी ||१३|| अनाथ मुलांसाठी शाळा | कर्णबधीरांसाठी शाळा | तशाच बांधाव्या गोशाळा | या भारतभूमीत ||१४|| गाय आपुली आहे माता | गोमाता आपुली देवता | जी प्रिय कृष्ण भगवंता | जीवापाड सांभाळावी ||१५|| गाई म्हशी निकामी होता | बळेच त्यांना गाडीत बांधता | मारण्यासाठी खाटिकांस देतां | हे तर महापाप ||१६|| | शेणखताचा उपयोग होतो | जमिनीचा कस वाढतो | शुद्ध गोमुत्राचा उपयोग होतो | रोग निवारणासाठी ||१७|| गोउत्पादने खास असती | गोसंस्था ती निर्माण करती | वापरून त्याची घ्यावी प्रचीती | प्रत्येक व्यक्तीने ||१८|| गोमय सर्वांकरिता | गोमुत्र औषधांकरीता | अनेक प्रसाधन उत्पादनांकरीता | वापर आहे प्रचलित ||१९|| गोशाळेस दान द्यावे | गोप्रजातीस सांभाळावे | गोउत्पादनांस जाणून घ्यावे | गोशाळेत जाउनी ||२०|| गाईच्या दुधाने शक्ती मिळते | गाईच्या दुधाने कांती चमकते | मेंदूची स्मरणशक्ती वाढते | बुद्धीवर्धक उपाय ||२१|| रसायनांनी थैमान घातले | फळे भाज्या सर्वत्र मिसळले | नसानसांत अवघे भिनले | मानवी जीवनांत ||२२|| प्रदूषणावर आहे उपाय | गाय आपुली माय | गाईविना तरणोपाय | आता नाही ||२३|| व्रत हे अंगिकारावे | गाईस आपुले मानावे | गाईचे ऋण फेडावे | ह्याच जन्मी ||२४|| मनात नसावा संशय | गाय तारील निःसंशय | आता करावा सुनिश्चय | गोवंश वाढवावा ||२५|| गरीब आणि धनीकाने | दान द्यावे स्वखुशीने | गोमहती अभिमानाने | सांगावी जगाला ||२६|| गाय खाटिकांस देता कोणी | विरोध करावा सर्वांनी | प्राण गाईचे वाचवुनी | गोहत्या रोखावी ||२७|| गोमांसाची निर्यात | नका करू परदेशात | भारतीयांची गोप्रजात | वाचविली पाहिजे ||२८|| गाय नसावी संकरीत | आयात थांबवा त्वरित | नष्ट न व्हावी गोप्रजात | भारत देशाची ||२९|| भारत देश कृषिप्रधान | गोधनाने व्हावा सधन | समृद्धीचे प्राचीन साधन | अवलंबावे देशाने ||३०|| करावे गाईंचे रक्षण | करावे धर्माचे रक्षण | करावे राष्ट्राचे रक्षण | प्रत्येक भारतीयाने ||३१|| || श्री कृष्ण भगवान की जय || || श्री गोमाता की जय|| |
प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे. पत्ता- "वैद्य सदन", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र.-४००६०१ संपर्क - ०२२ - २५३३३८६९ , २५३२६४२९ , | |
हे स्तोत्र दादर येथून निघणा-या "भक्तीसंगम" MAY 2011ह्या मासिकात प्रकाशित झाले आहे.
PRESS CTRL KEY AND SCROLL UP THE MIDDLE BUTTON OF MOUSE TO SEE ENLARGED VIEW.
श्रीमत सदगुरू संत, गाडगे बाबा महाराज कि जय
|| श्री गाडगेबाबा महाराज कथा सार स्तोत्र || | |
|| कर्मयोगी, वैराग्यमूर्ती, अनाथांचा नाथ, व्रतस्थ || || श्रीमत सदगुरू संत, गाडगे बाबा महाराज कि जय || | |
विदर्भात जिल्हा अमरावती | महाशिवरात्रीस शेड गावी | आई सखुबाई,वडील झींगराजीचा | बालक डेबू जन्मला ||१|| वडिलांचा मृत्यू लवकर झाला | डेबू मामांच्या घरी राहिला | दापुरा गावी मोठा झाला | गुराख्याचे काम करुनी ||२|| डेबुचा बालविवाह झाला जरी | मामा डेबुचे झाले कर्ज बाजारी | गहाण पडली सावकार दरबारी | शेतजमीन मामांची ||३|| सावकार मतलबी होता हुशार | खटला चालविला जमिनीवर | तडजोड करुनी काही एकर | जमीन लाटली सावकाराने ||४|| नंतर एक प्रसंग घडला | डेबूला एक साधू भेटला | घरदार संसार डेबूने सोडला | डेबू झाला बैरागी ||५|| आकाश हेच झाले छप्पर | पृथ्वी हेच बनले घर | डोक्यावर गाडग्याचे खापर | वैराग्यमूर्ती गाडगेबाबा ||६|| आधी काम झाडलोट करणे | मग खापरीत भिक्षा मागणे | भूकेपुरतेच अन्न घेणे | चून भाजी अर्धी भाकर ||७|| गोपालागोपाला देवकीनंदन गोपाला | हाच मंत्र त्यांनी जपला | चिंध्यांचाच सदरा घातला | काठी खापर हातामधे ||८|| स्वतः कोरडी भाकर खाती | जनावरास खाऊ घालती | भुकेल्या जीवाचे पोट भरती | स्वतःचा घास देऊन ||९|| स्वतः झाडू हाती घेतला | रस्ता झाडून स्वच्छ केला | स्वच्छतेचा संदेश दिला | अविरत अहोरात्र ||१०|| सकाळी गावं स्वच्छ करणे | सांज सकाळ भिक्षा मागणे | रात्री कीर्तन प्रबोधन करणे | व्रत हे गाडगे बाबांचे ||११|| बकरे कोंबडे कापू नका | मुक्या प्राण्यास मारू नका | अंधश्रद्धा ठेऊ नका | समजाविती गावक-यांना ||१२|| तंबाखू तुम्ही खाऊ नका | दारूला स्पर्श करू नका | व्यसनात तुम्ही गुंतू नका | सांगती गाडगेबाबा ||१३|| | अनेक बांधल्या धर्मशाळा | मुलांसाठी बालवाडी शाळा | गाई गुरांसाठी गोशाळा | बांधल्या जनश्रमदानामधुनी ||१४|| अनेक बांधली इस्पितळे | पाण्यासाठी पाणपोई तळे | बांधू नका माझी देऊळे | खडसाविले लोकांना ||१५|| बाबांनो एकवेळ उपाशी रहा | पण मुलाबाळांस शिकवा | घर गावं स्वच्छ ठेवा | हाच मंत्र बाबांचा ||१६|| आधी सोडावी व्यसंनाधीनता | मग करावी ग्रामस्वच्छता | रुजवा बाल प्रौढ साक्षरता | त्रिसूत्री गाडगे बाबांची ||१७|| जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | हे तत्व ज्यांनी जपले | ते श्री संत गाडगे बाबा ||१८|| ग्रामस्वच्छता करीत राहिले | गावोगावी फिरत राहिले | जनजागरण करीत राहिले | व्रतस्थ कर्मयोगी ||१९|| चंदनापरी झिजविली काया | अनाथावारी केली माया | दिनदुबळ्यास दिली छाया | आश्रमशाळा बांधुनी ||२०|| जनसेवा हेच मानिले तत्व | स्वच्छतेचे सांगितले महत्व | कर्मयोगाने मिळाले अमरत्व | श्री संत गाडगे बाबांना ||२१|| अखेर वय वर्षे पंच्याहत्तरीत | प्रकृती गेली खालावत | बाबांची मालवली प्राणज्योत | रात्री सुमारे बारा वाजता ||२२|| पहाड तो दुःखाचा कोसळला | भक्तांनी हंबरडा फोडला | आसमंत सारा दणाणून गेला | पेठी नदीच्या पुलाजवळ ||२३|| गाडगेबाबांचा घेऊ वसा | चालवू त्यांचा पुढे वारसा | संदेश घेऊ गाडगेबाबांचा | श्रमदान जनसेवेचा ||२४|| गाडगेबाबा सदगुरू मूर्ती | सर्वदूर ज्यांची पसरली कीर्ती | चला गाऊ त्यांची महती | समाजसेवा करुनी ||२५|| || ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः || || शुभम भवतु || शुभम भवतु || शुभम भवतु || |
प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे. पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१ | |
|| कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ | तेरा कर्म करने में ही अधिकार है, उसके फलों में कभी नहीं । इसलिए तू कर्मों के फल हेतु मत हो तथा तेरी कर्म न करने में भी आसक्ति न हो । | |
हे स्तोत्र दादर येथून निघणा-या "भक्तीसंगम" मार्च 2011ह्या मासिकात प्रकाशित झाले आहे.
PRESS CTRL KEY AND SCROLL UP THE MIDDLE BUTTON OF MOUSE TO SEE ENLARGED VIEW.
|| करीअर कथा ||
हि कविता खाली दिलेल्या संकेत स्थळावरही आहे.
http://new/sec_yuva/may2011_yuva01.html
बारावीचा निकाल | मग सीईटीचा परीक्षाकाळ |
http://new/sec_yuva/may2011_yuva01.html
बारावीचा निकाल | मग सीईटीचा परीक्षाकाळ |
परीक्षांचा झाला सूकाळ | आता ठाई ठाई ||१||
इंजिनीअरिंग का मेडिकल | जाणावा आपुला कल |
पडताळावे इतर सकल | विषय आणि पर्याय ||२||
शिक्षणाचे मार्ग सगळे | पर्याय अनेक वेगळे
जे आपणा न कळे | तज्ञांना विचारावे ||३||
बारावी नंतर काय | प्रश्न करती वडील माय |
आहे यावर उपाय | फक्त मुलांची आवड ||४||
बाळाचे पाय पाळण्यात दिसती | उक्ती अनुभवी सांगती |
त्याची घ्यावी प्रचिती | मुलांच्या भल्यासाठी ||५||
आवडीचे क्षेत्र निवडावे | तसेच मार्गदर्शन करावे |
मुलांचे भले पाहावे | प्रथम त्यांच्या आवडीत ||६||
आपली आवड कशात | जाणून त्या विषयांत |
मेहनत करावी त्यांत | मुलांनी प्रगतीसाठी ||७||
प्रसिध्द खेळाडू किती | यशस्वी ते उद्योगपती |
त्यांनी केली प्रगती | आवडीच्या विषयांत ||८||
जी आपली आवडी | त्यात घेतली आघाडी |
ते क्रिकेट खेळगडी | फक्त बारावी पास ||९||
गुण असती उपजत | त्यांनाच घालावे खत |
नाही येणार आफत | भविष्यात चिंतेची ||१०||
आवडीच्या विषयात | थोडीच पुरते मशागत |
विषय होईल अवगत | पटकन लवकर ||११||
गायक सुरात नाहले | नायक अभिनयात मुरले |
नर्तक तालात नाचले | आनंदात सुखेनैव ||१२||
चित्रकार चित्रात रंगले | शिल्पकार शिल्पात घडले |
कलाकार कलेत रमले | जातीचे कलावंत ||१३||
आवडीच्या विषयात करता कष्ट | आळस होतो नष्ट |
आलेख दिसतो स्पष्ट | उज्ज्वल भविष्याचा ||१४||
काही चालती धोपट मार्गे | काही धावती झटपट मार्गे |
नका जाऊ आडमार्गे | पैसा आणि प्रगतीसाठी ||१५||
जपावी नैतिकता | निवडा आवडीची उद्योजकता |
नेटाने कष्ट करता | प्रगती आहे निश्चित ||१६||
कोणी करती चर्मोद्योग | कोणी करती कुटीरोद्योग |
करावा असाच उद्योग | मराठी माणसाने ||१७||
निर्णय नसावा अयोग्य | विचार करावा सुयोग्य |
शिक्षण निवडा स्वयोग्य | आवडीच्या विषयात ||१८||
छंद विषयांत नाही ताप | कामाचा नाहीच संताप |
शक्य होते करणे प्रताप | दडपणाशिवाय ||१९||
काम होईल झटपट | उत्साहात छान पटापट |
वाटणार नाही कटकट | आवडीच्या विषयाने ||२०||
आवड असता नाही डोकेफोड | बोलता येईल फडाफड |
प्रश्नांची उत्तरे सडेतोड | देता येतील सदैव ||२१||
आयुष्य सरेल छान मस्त | मन राहील आनंदे चुस्त |
काम होता बिनधास्त | सूर सापडेल प्रगतीचा ||२२||
काम जमता निश्चित | भविष्य नसेल अनिश्चित |
जीवन प्रवाह विनाखंडित | पार पडेल सुरळीत ||२३||
क्षेत्र आवडीचे निवडावे | पदवीस प्राप्त करावे |
प्राविण्य पुढे मिळवावे | प्रयत्ने सातत्याने ||२४||
करिअरची होता घटट मुळे | जीवन वृक्ष फुले फळे |
जीवन अवघे उजळे | समस्त कुटुंबियांचे ||२५||
करिअर कथा वाचावी | तशीच लोकांस सांगावी |
कथेची प्रचिती घ्यावी | सर्व विद्यार्थ्यांनी ||२६||
सुरेश पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम)
भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९,
Email ID - kharichavata@gmail.com
रविवार, २९ मे, २०११
|| वारी आषाढीची ||
होता राम प्रहर | करू विठ्ठलाचा गजर | सातशे वर्षे निरंतर | परंपरा वारीची ||१|| धोतरटोपी वेश पांढरा | घालूनी स्वच्छ सदरा | पंढरीची वाट धरा | म्हणे वारकरी ||२|| खाऊ चून भाकरी | चला गाठू पंढरी | मुखे बोलू श्रीहरी | म्हणे वारकरी ||३|| |
तुळस घेऊ डोईवरी | आम्ही विठूचे माळकरी | विठ्ठल विठ्ठल हरी | म्हणे वारकरी ||४|| सगुण भक्तीचा संग | वारकरी होतो दंग | गातो रसाळ अभंग | राम कृष्ण हरी ||५|| हरीनाम गर्जते वाणी | चालू आम्ही अनवाणी | पाहू चला चक्रपाणि | पांडुरंग हरि ||६|| |
वेध आता आषाढीचे | नाम मुखी विठ्ठलाचे | विठ्ठल नामे नाचे | विठूचा वारकरी ||७|| टाळ मृदुंग वाजे | तुळशीमाळ गळा साजे | विठ्ठल नाम गर्जे | चाले वारकरी ||८|| ऊंच पताका फडकती | वारकरी फेर धरती | घागरी डोईवरती | चाले वारकरी ||९|| |
चंदन टिळा कपाळी | टाळ वीणा वाजे चिपळी | पालखी हि आगळी | चाले वारकरी ||१०|| भक्त जमले प्रांगणी | अश्व धावतो रिंगणी | पहा सोहळा पटांगणी | म्हणे वारकरी ||११|| वारक-यांचा हा मेळा | उभा विठोबा सावळा | पाहू भरुनिया डोळा | म्हणे वारकरी ||१२|| |
अबीर गुलाल उधळा | उधाण भजनी मंडळा | आनंद भरला सगळा | विठ्ठलाच्या दारी ||१३|| उत्सव हा वेगळा | एकमेका भेटू गळा | पाहू विठू वेळोवेळा | चंद्रभागेतिरी ||१४|| |
प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे. चेंदणी, ठाणे संपर्क - ०२२ - २५३२६४२९ , भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ , |
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...
-
नमस्कार श्री कुंडलिनी स्तुति स्तोत्र हे मी बरेच दिवसापासून शोधत होतो अनेक ठिकाणी चौकशी करून सुद्धा मला हे सापडत नव्हते महाजालावर स...





